TRENDING:

धक्कादायक... मुंबईतील तब्बल ५७ मराठी शाळांवर बंद होण्याची टांगती तलवार

Last Updated:

मराठी राजभाषा दिवस साजरा करायची जोरदार तयारी सुरू असताना ५७ मराठी शाळांवर बंद होण्याची टांगती तलवार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सुस्मिता भदाणे, प्रतिनिधी, मुंबई : संच मान्यतेच्या कडक नियमांमुळे मुंबईतील तब्बल ५७ मराठी शाळांवर बंद होण्याची टांगती तलवार आहे. अपुरी विद्यार्थीसंख्या आणि शिक्षकांच्या नियुक्तीअभावी या शाळा बंद करण्याची वेळ प्रशासनावर येत असल्याची माहिती समोर येत आहे.
मराठी शाळा
मराठी शाळा
advertisement

बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या ५७ शाळांपैकी ३४ शाळा पश्चिम मुंबई जिल्ह्यातील, १९ शाळा उत्तर मुंबईतील तर ४ शाळा दक्षिण मुंबईतील असल्याचे स्पष्ट झाले आहे. मराठी शाळांना आवश्यक भौतिक सुविधा, आर्थिक मदत आणि संच मान्यतेबाबत संरक्षण द्यावे, अशी मागणी आता विविध स्तरांतून जोर धरू लागली आहे.

मुंबईतील शाळांची सद्यस्थिती

मुंबईत एकूण शाळा – १,७३९

advertisement

इंग्रजी व इतर अल्पसंख्याक शाळा – ९४५

मराठी माध्यमाच्या शाळा – ३३७

अल्पसंख्याक शाळांपैकी ५०५ शाळा भाषिक अल्पसंख्यांक

धार्मिक अल्पसंख्याक शाळांमध्ये –

उर्दू – १७०

ख्रिश्चन – १९९

काय आहेत बदललेले नियम?

बंद पडण्याच्या मार्गावर असलेल्या ५७ शाळांपैकी

३४ शाळा पश्चिम मुंबई जिल्ह्यातील

१९ शाळा उत्तर मुंबईतील

४ शाळा दक्षिण मुंबईतील

advertisement

यापूर्वी शाळेच्या एकूण पटसंख्येच्या आधारे प्रत्येक २० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षकपद सरकारकडून मंजूर केले जात होते. मात्र शिक्षण विभागाच्या नव्या नियमावलीनुसार आणि सॉफ्टवेअर प्रणालीमुळे आता शिक्षकपदांची मान्यता शाळेच्या एकूण पटसंख्येऐवजी प्रत्येक इयत्तेतील विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार दिली जाणार आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हॉटेलमध्ये महाग मिळणारं इटालियन डेझर्ट फक्त 50 रुपयांपासून, मुंबई हे आहे लोकेशन
सर्व पहा

मराठी शाळांची संख्या कमी होत असताना,मुंबईतील अनेक शाळांना अल्पसंख्याक दर्जा देत आहे. यामुळे मराठी शाळाच जर टिकल्या नाहीत तर मराठी भाषा, संस्कृती धोक्यात येण्याची शक्यता जाणकार बोलून दाखवत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
धक्कादायक... मुंबईतील तब्बल ५७ मराठी शाळांवर बंद होण्याची टांगती तलवार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल