TRENDING:

Mumbai Metro : मुंबईकरांसाठी खूशखबर, गर्दीच्या वेळेत दर 5 मिनिटांनी धावणार मेट्रो, 280 फेऱ्यांची तयारी, संपूर्ण माहिती

Last Updated:

Mumbai Metro 3 : मुंबई मेट्रो 3 चा शेवटचा टप्पा उद्यापासून सुरू होणार आहे. गर्दीच्या वेळी दर 5 मिनिटांनी गाड्या चालतील.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आरे ते कफ परेडदरम्यान भुयारी मेट्रो 3 मार्गिकेवर प्रवाशांसाठी मोठा बदल होणार आहे. उद्यापासून या मार्गावर गर्दीच्या वेळी दर पाच मिनिटांनी मेट्रो सेवा चालवली जाईल, ज्यामुळे प्रवास अधिक सुलभ होईल. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन यांनी 280 फेऱ्या दररोज चालवण्याची तयारी पूर्ण केली आहे.
News18
News18
advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 8 ऑक्टोबर 2025 रोजी भुयारी मेट्रो ३ मार्गिकेचे लोकार्पण करण्यात येणार आहे. एमएमआरसीने 33.9 किमी लांबीची मेट्रो मार्गिका तयार केली आहे, ज्यामध्ये एकूण 27 स्थानके आहेत. आरे ते बीकेसी हा मार्गिकेचा पहिला टप्पा 12.69 किमी लांबीचा असून तो 7 ऑक्टोबर 2024 पासून प्रवाशांसाठी उपलब्ध आहे.

advertisement

दुसरा टप्पा बीकेसी ते आचार्य अत्रे चौक (वरळी नाका) 9.77 किमी लांबीचा असून 9 मे 2025 रोजी लोकार्पित झाला. या दोन्ही टप्प्यांमुळे आरे ते आचार्य अत्रे चौक दरम्यान एकूण 16 स्थानकांवर मेट्रो सेवा सुरू झाली असून दररोज सरासरी 70 हजार प्रवासी या मार्गाचा वापर करत आहेत.

शेवटच्या टप्प्यातील आचार्य अत्रे चौक ते कफ परेडपर्यंत 11.2 किमी लांबीच्या मार्गावर मेट्रो सेवा उद्यापासून सुरू होणार आहे. या मार्गासाठी 28 मेट्रो गाड्या तयार ठेवण्यात आल्या आहेत. सकाळी पहिली गाडी 5:55 वाजता सुरु होईल तर रात्रीची शेवटची गाडी 10:30 वाजता सुटेल.

advertisement

शेवटच्या टप्प्यातील 11 स्थानके खालीलप्रमाणे आहेत

कफ परेड, विधान भवन, चर्चगेट, हुतात्मा चौक, सीएसएमटी, काळबादेवी, गिरगाव, ग्रँट रोड, मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी आणि सायन्स म्युझियम.

भुयारी मेट्रो 3 प्रकल्पाची सुरुवात जानेवारी 2017 मध्ये झाली होती. नोव्हेंबर 2022 पर्यंत भूमिगत रस्त्याचे काम पूर्ण झाले. पहिला टप्पा 7 ऑक्टोबर 2024 पासून सुरू झाला, तर दुसरा टप्पा 10 मे 2025 पासून सेवेत आहे.

advertisement

ही मार्गिका शहरातील प्रमुख केंद्रांना जोडते. नरिमन पॉइंट, कफ परेड, फोर्ट, लोअर परेल, बीकेसी आणि सीप्झ यासारखी व्यावसायिक केंद्रे थेट जोडली जात आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 1 आणि टर्मिनल 2 यांच्याशी थेट संपर्क साधला आहे. मेट्रो 3 इतर मार्गिकांशीही जोडलेली आहे. स्वामी समर्थनगर ते कांजूरमार्ग मेट्रो 6, घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो 1, दहीसर ते विमानतळ मेट्रो 7 व 7अ, मंडाळे ते डी.एन. नगर मेट्रो 2 आणि चेंबूर ते सात रस्ता मोनोरेल

advertisement

जाणून घ्या मेट्रोच्या तिकीटाचे दर

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
महिलांनो व्यवसाय सुरू करायचाय? पुण्यात इथं मिळतंय मोफत मार्गदर्शन, Video
सर्व पहा

यामुळे मुंबईकरांचा प्रवास अधिक जलद, सोयीस्कर आणि वेळेवर होईल. दररोज अंदाजे 13 लाख प्रवासी मेट्रो 3 मार्गिकेचा वापर करण्याची अपेक्षा आहे. भाडे दरही किमान 10 रुपये ते जास्तीत जास्त 70 रुपये ठेवण्यात आले आहेत, ज्यामुळे प्रवास किफायतशीर राहील.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Mumbai Metro : मुंबईकरांसाठी खूशखबर, गर्दीच्या वेळेत दर 5 मिनिटांनी धावणार मेट्रो, 280 फेऱ्यांची तयारी, संपूर्ण माहिती
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल