महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर आदी शहरांत अवैधपणे वास्तव्य करणारे बांगलादेशी नागरिकांच्या मु्द्यांवरून भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी रान उठवले आहे. विविध शहरांत जाऊन तेथील बांगलादेशींची माहिती घेऊन कारवाई करण्याच्या सूचना ते पोलिसांना देत आहेत. ऐन दिवाळीत मुंबई पोलिसांनी गोवंडी भागातून किन्नर गुरू बाबू खान हिला अटक केली.
advertisement
बाबू खान हिची मुंबईत तब्बल २० घरे असल्याची माहिती
बाबू खान हिचे २०० पेक्षा जास्त चेले आहेत. मुंबईतील गोवंडीमध्ये ती वास्तव्याला आहे. बाबू खान हिची मुंबई उपनगरांत बऱ्याच ठिकाणी संपत्ती असल्याचे तपासातून समोर आले आहे. तिची जवळपास मुंबईत २० घरे असल्याची माहिती आहे. बांगलादेशातून आलेल्या लोकांना राहायला ती जागा देत होती. स्थानिक नागरिकांनी याविषयीची माहिती गोवंडीतील शिवाजीनगर पोलिसांना दिली. त्यानंतर माहिती पडताळून किन्नर माँ अर्थात बाबू खान हिला पोलिसांनी अटक केली. तिची विविध कागदपत्रे पडताळली असता ते बोगस असल्याचे निष्पन्न झाले.
बाबू खान हिचे बांगलादेशी नागरिकांना मुंबईत आणण्याचे रॅकेट
बांगलादेशी नागरिकांना अवैधपणे मुंबईत आणण्याचे रॅकेट बाबू खान उर्फ ज्योती माँ चालवायची. पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद सीमेवरून ती लोकांना अवैधपणे भारतात आणत. संबंधिक लोकांना कोलकात्यात आठवडाभर थांबवून त्यांचा बनावट शाळेचा दाखला आणि जन्म दाखला बनवत. त्यानंतर त्यांना मुंबईत आणले जायते. गोवंडीच्या शिवाजीनगर भागात ज्योती माँ त्यांना आश्रय द्यायची.