मुंबईकरांना व विशेषतः बच्चे कंपनीला दिवाळी सुटीचा आनंद अधिक चांगल्या पद्धतीने घेता यावा, या उद्देशाने दिवाळी कालावधी दरम्यान असणा-या सार्वजनिक सुट्टयांच्या दिवशी वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय नागरिकांसाठी खुले ठेवण्यात येणार आहे. या अंतर्गत ‘बलिप्रतिपदा दीपावली पाडवा’ निमित्त बुधवार, दिनांक २२ ऑक्टोबर २०२५ व ‘भाऊबीज’ निमित्त गुरुवार, दिनांक २३ ऑक्टोबर २०२५ रोजी सार्वजनिक सुटी आहे. मात्र, असे असले तरी, सदर दोन्ही दिवशी अर्थात बुधवार, दिनांक २२ ऑक्टोबर २०२५ व ‘भाऊबीज’ निमित्त गुरुवार, दिनांक २३ ऑक्टोबर २०२५ रोजी वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय जनतेकरिता खुले राहणार आहे.त्यामुळे बच्चे कपंनींना या दोन दिवसात राणीची बाग फिरण्याचा मनसोक्त आनंद लुटता येणार आहे. तसेच तर शुक्रवार, दिनांक २४ ऑक्टोबर २०२५ रोजी बंद असणार आहे, असे बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे कळवण्यात येत आहे.
advertisement
भायखळा (पूर्व) परिसरातील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय साप्ताहिक सुट्टीनिमित्त दर बुधवारी बंद असते. मात्र, बृहन्मुंबई महानगरपालिकेने यापूर्वी मंजूर केलेल्या एका ठरावानुसार बुधवारी सार्वजनिक सुट्टी आल्यास त्यादिवशी उद्यान व प्राणिसंग्रहालय जनतेसाठी खुले राहते.या ठरावानुसार, बुधवार, दिनांक २२ ऑक्टोबर २०२५ व गुरुवार, दिनांक २३ ऑक्टोबर २०२५ रोजी वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय जनतेसाठी खुले राहणार आहे, असे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून कळविण्यात येत आहे.