याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एकूण 22 किलोमीटर लांबीच्या आणि 22 स्टेशन्सचा समावेश असलेल्या 'मेट्रो 3 ब' या मार्गिकेचं काम एमएमआरडीए दोन टप्प्यात करत आहे. मंडाले ते डायमंड गार्डन आणि डायमंड गार्डन ते मंडाले, असे हे दोन टप्पे आहेत. यापैकी मंडाले ते डायमंड गार्डन टप्प्याचं काम जवळपास पूर्ण झालं आहे. दिल्लीतील मेट्रो रेल्वे सुरक्षेच्या (सीएमआरएस) मेट्रो आयुक्तांच्या पथकाकडून काही दिवसांपासून चाचण्या देखील सुरू होत्या. आता मेट्रो आयुक्त प्रत्यक्ष पाहणी करतील आणि त्यानंतर या मार्गाला सुरक्षा प्रमाणपत्र मिळेल.
advertisement
Mumbai Metro: मेट्रोसाठी राज्य सरकारची तिजोरी पुन्हा उघडली! मुंबई-ठाण्याला दिले 462 कोटी
येत्या काही दिवसांत सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्यास ऑक्टोबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात ही मार्गिका प्रवाशांसाठी सुरू होण्याची शक्यता आहे. मंडाले ते डायमंड गार्डन मेट्रो सुरू झाल्यास मुंबईतील वाहतूक सेवेत दाखल होणारी ही पाचवी मार्गिका ठरणार आहे. याबाबत एमएमआरडीएकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
दरम्यान, येत्या 30 सप्टेंबर रोजी कुलाबा ते वांद्रे-सीप्झ ते आरे भुयारी मेट्रो 3 मार्गिकेतील शेवटच्या आचार्य अत्रे चौक ते कफ परेड टप्प्याचं लोकार्पण होणार असल्याची चर्चा होती. मात्र, आता हा मुहूर्त पुढे गेला असून ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण होण्याची शक्यता आहे. याच वेळी मेट्रो 2 ब मार्गिकेतील पहिल्या टप्प्याचंही लोकार्पण होईल अशी चर्चा आहे.