TRENDING:

ओलीसनाट्याचा थरार ते रोहित आर्यचा एन्काऊंटर, मुंबईतील स्टुडिओमध्ये नेमकं काय घडलं? A टू Z थरार

Last Updated:

ओलीस नाट्यादरम्यान पोलिसांनी केलेल्या गोळीबारात रोहित आर्या या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मुंबईतल्या पवईत ओलीसनाट्याचा थरार पाहायला मिळाला आहे. रोहित आर्या या व्यक्तीनं 17 विद्यार्थ्यांना ओलीस ठेवलं होतं. या ओलीस नाट्याची माहिती मिळताच मुंबई पोलीस घटनास्थळी दाखल झालं. तब्बल सव्वा दोन तासानंतर हे ओलीस नाट्य संपलं. या ओलीस नाट्यादरम्यान पोलिसांनी केलेल्या गोळीबारात रोहित आर्या या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
News18
News18
advertisement

मुंबईतल्या पवई भागात गुरुवारी भर दुपारी ओलीसनाट्याचा थरार रंगला होता. रोहित आर्या या व्यक्तीनं आरए नावाच्या स्टुडिओत 17 मुलांना ओलीस ठेवलं होतं.रोहित आर्याजवळ बंदुकही होती. या बंदुकीच्या आधारे त्याने या मुलांना ओलीस ठेवलं होतं. जवळपास दोन तास ओलीस नाट्य चाललं आहे. या थरारादरम्यान पोलिसांनी केलेल्या गोळीबारात रोहित आर्याचा मृत्यू झाला.

advertisement

जवळपास सव्वादोन तास थरार चालला, वेबसीरिजच्या ऑडिशनसाठी मुलं पवईत आली होती. गेल्या 6 दिवसांपासून मुलं ऑडिशनला येत होती.दुपार झाली तरी मुलं जेवायला आली नाहीत. दुपारी 1.45 वाजता पोलिसांना पालकांनी फोन केला. 17 मुलं,एक वयस्कर माणसाला रोहित आर्यानं ओलीस ठेवलं होतं.दुपारी 4 वाजता पोलिसांनी इमारतीला वेढा घातला.पोलिसांनी इमारतीचे एन्ट्री-एक्झिट बंद केली.डक एरियातून पोलिसांनी बाथरूममध्ये प्रवेश केला केला.रोहितकडे शस्त्र असल्यानं पोलिसांनी गोळीबार केला केला आणि आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

advertisement

या ओलीसनाट्यात ठार झालेला झालेल्या रोहित आर्यानं या घटनेदरम्यान एक व्हिडिओही पाठवला होता.रोहित आर्याने सरकारच्या माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत स्वच्छता मोहीमेत सहभाग घेतला होता.या योजनेचे पैसे शालेय शिक्षण विभागानं थकवल्याचा आरोप रोहित आर्यानं केलाय.

रोहित आर्याचे आरोप 

शालेय शिक्षण विभागाकडून वारंवार अन्याय झाल्याचा तसेच निधीबाबत अधिकाऱ्यांची भूमिका कायम नकारात्मक होती असा आरोप रोहित आर्यानं केलाय.शासनानं निधी थकवल्याचा आरोप करत स्वखर्चानं योजना राबवल्याचं रोहित आर्याचं म्हणणं आहे...चौकशीच्या नावाखाली खोट्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा तसेच आपल्या योजनेचा इतरांनी लाभ घेतल्याचाआरोप रोहित आर्यानं केलाय.रोहित आर्यानं या थकीत निधीबाबत उपोषणही केलं होतं.

advertisement

या प्रकरणात माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी पुढे येत स्पष्टीकरण दिलंय..रोहित आपल्या मनाप्रमाणे मागण्या करत होता.विशिष्ट अकाऊंटच्या माध्यमातून पैसे जमवले,अधिकाऱ्यांनी सांगितलं

निधी थकला असता तर ताबडतोब दिला असता  2 कोटींचं देणं नव्हतंच. रोहित आर्याला वैयक्तिक मदतही केली होती, असं स्पष्टीकरण माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी दिलं दिलंय...

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
गुड न्यूज! सोयाबीन दरात झाली वाढ, कांद्याची काय स्थिती? Video
सर्व पहा

मुंबई पोलिसांनी तत्परतेनं केलेल्या कारवाईमुळं रोहित आर्याच्या तावडीत असलेल्या 17 मुलांची वेळीच सुटका केल्यानं मोठा अनर्थ टळला आहे.  या घटनेनिमित्तानं निर्माण झालेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं मात्र अनुत्तरितच आहेत.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
ओलीसनाट्याचा थरार ते रोहित आर्यचा एन्काऊंटर, मुंबईतील स्टुडिओमध्ये नेमकं काय घडलं? A टू Z थरार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल