घटनेबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी नागपुरातील मध्यवर्ती पोलीस स्टेशन असलेल्या सीताबर्डी पोलीस ठाण्यात एक निनावी फोन आला. या व्यक्तीनं पोलीस ठाण्यात बॉम्बस्फोट होणार असल्याची माहिती दिली. या फोनमुळे पोलीस सतर्क झाले, पोलीस ठाणे रिकामं करण्यात आलं. बॉम्बचा कसून शोध घेण्यात आला, मात्र पोलीस ठाण्यात काहीही आढळून आलं नाही. कोणीतरी खोडसाळपणानं फोन केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. या प्रकरणात आता पोलीस त्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.
advertisement
आरोपीचा शोध सुरू
बुधवारी पोलीस स्टेशनमध्ये बॉम्ब असल्याची माहिती मिळाली होती. एक निनावी फोन आला होता. त्यानंतर तपास केला असता काहीही आढळून आले नाही. या प्रकरणातील आरोपीचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
Location :
Nagpur,Nagpur,Maharashtra
First Published :
Aug 03, 2023 9:26 AM IST
