ठक्करग्राम येथे पोलीस पेट्रोलिंग करीत असताना त्यांना एका महिलेचा संदेश प्राप्त झाला. 112 क्रमांकावरून पोलीस नियंत्रण कक्ष नागपूर शहर यांच्या मार्फत एका महिलेचा संदेश मिळाला. महिलेच्या संदेशात तिने सांगितलेलं, की "तिला आणि तिच्या मुलाला तिच्या नवऱ्याने दारूच्या नशेत मारहाण केली असून दोघांनाही घराबाहेर काढले आहे. तिच्या पतीने दरवाजा आतून बंद केला आहे "
advertisement
सदरच्या घटनेचं गांभीर्य ओळखून लगेचच पोलीस स्टेशन हद्दीतील बीट मार्शल घटनास्थळी दाखल झाले. सदर ठिकाणी 10 ते 15 लोकांची गर्दी होती. बीट मार्शल यांनी तात्काळ दरवाजा वाजवला. परंतु आतमधून प्रतिसाद आला नाही. बीट मार्शल यांनी घराचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला त्यावेळी धक्कादायक प्रकार समोर आला. पती हा पंख्याला ओढणी बांधून गळफास घेत होता.
सावधान! चिकन शोरमा आवडीने खाताय? खाताच 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू, मुंबईतील खळबळजनक घटना
बीट मार्शल प्रफुल आणि देवेंद्र यांनी तात्काळ त्याचे पाय पकडले आणि अतुलने पटकन स्टूल घेऊन ओढणी सोडली. सदर व्यक्ती हा फार घाबरलेला होता बीट मार्शल यांनी त्याला खाली उतरवलं. तसंच त्याला समजावत गळफास लावून घेण्याचं कारण विचारलं. यानंतर सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. गळफास घेण्याचं कारण हेच होतं, की पत्नीने गरम भाजी न देता थंड भाजी जेवणात वाढली.
सर्व बीट मार्शल यांनी दाखवलेले प्रसंगावधान आणि कर्तव्यातील तत्परता यामुळे या व्यक्तीचा जीव वाचवण्यात यश आलं. या चांगल्या कामगिरीबाबत पोलीस स्टेशन पाचपावलीचे बीट मार्शल अतुल, मनोज, देवेंद्र आणि प्रफुल यांच्या कार्याची मा. पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी स्वतः दखल घेतली. त्यांना प्रत्यक्ष त्यांच्या कार्यालयात बोलवून त्यांच्या या कार्याबद्दल त्यांची प्रशंसा करून पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.