डीएनए चाचणीच्या रिपोर्टवरुन तो मृतदेह सना खान यांचा नसल्याचं समोर आलं आहे. हरदा नदीशेजारी एका विहिरीत मिळता जुळता मृतदेह आढळला होता. पण तो मृतदेह सना खानचा नसल्याचं आता स्पष्ट झालं आहे. दोन ॲागस्टला भाजप पदाधिकारी सना खान यांची जबलपूर येथे हत्या झाली होती. या घटनेला 40 दिवस उलटूनही सना खानचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही.
advertisement
Sana Khan : सना खानची हत्याच, पोलिसांच्या हाती लागले महत्त्वाचे धागेदोरे
सना खान यांच्या हत्तेतील आरोपी अमित शाहू सेक्सटोर्शन रॅकेट चालवायचा, असं समोर आलं आहे. तो श्रीमंत लोकांना आपल्या जाळ्यात अडकवायचा. मानकापूर पोलीस स्टेशनमध्ये मेहरूनिसा खान यांच्या तक्रारीवरून आरोपी पप्पू साहूविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेरीस या प्रकरणी आरोपी अमित शाहुला नागपूर पोलिसांनी अटक केली. त्याची चौकशी केली असताना त्याने सना खान यांची हत्या केल्याची माहिती पोलिसांना दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमितने पत्नी सना खानची हत्या ही पैशांच्या व्यवहारातून केली असल्याचं समोर येतंय. अमित साहूने पत्नीकडून 50 लाख रुपये इतकी रक्कम पार्टनरशिपसाठी घेतली होती. सनाने हे पैसे परत मागितले तेव्हा दोघांमध्ये वाद झाला.
