धारावीच्या मोर्चासाठी चंद्रावरुन माणसं आणली : ठाकरे
धारावीत काढलेल्या मोर्चाला बाहेरुन माणसं आणल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावर बोलताना उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना उपरोधिक टोला लगावला. धारावीत काढलेल्या मोर्चाला आम्ही चंद्रावरुन माणसं आणली होती. कारण, मोदींनी चांद्रयान वरती पाठवलं. तिथूनच आम्ही माणसं आणली होती. मला वाटतं तुम्ही धारावीच्या प्रश्नांवर बोला. या मोर्चात भाजप नव्हता, त्यामुळे सेटलमेंट होण्याचा प्रश्न होता.
advertisement
मध्ये चमचे का वाजतायेत : उद्धव ठाकरे
मी धारावीत मोर्चा काढल्यानंतर आम्हाला कळलं की त्यांचे चमचे कोणकोण आहेत? आम्ही प्रश्न प्रकल्प घेणाऱ्याला विचारला तर मध्ये चमचे का वाजतायेत? असा टोला उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना लगावला. त्यांच्या अर्धवट माहितीवरुन त्यांनी प्रश्न विचारू नये. विमानाला कुठेही टोल लागत नाही. त्यामुळे हाही विषय तिकडे येत नाही. एकतर त्या शालीचं वजन पेलतंय की नाही हे त्यांनी बघायला पाहिजे, दुसरं म्हणजे अर्धवट माहितीवर विचारलेल्या प्रश्नाला मी उत्तर देत नाही, असं उत्तर ठाकरेंनी दिलं आहे.
वाचा - उद्धव दादूनंतर राज ठाकरेही धारावीसाठी मैदानात, मविआसह शिंदे सरकारला विचारला थेट सवाल
राज ठाकरेंची टीका काय?
ठाकरे गटाने काढलेल्या मोर्चावर टीका करताना राज ठाकरे यांनी म्हटलं की, महाविकास आघाडीच्या नेत्यांना आता का जाग आली? हे जाहीर होऊन 8 ते 10 महिने झाले. पण आता का मोर्चा काढला जातोय? सेटलमेंट होत नाही का? असा प्रश्न राज ठाकरेंनी विचारला. इतक्या मोठ्या प्रकल्पासाठी मोकळी जागा लागते, खूप मोठा भाग आहे. तिथं किती शाळा, कॉलेजेस होणार आहेत? रस्ते कसे होणार? इमारतीत माणसं किती राहणार हे सगळं सांगावं लागतं. टाउन प्लॅनिंग नावाची गोष्ट असते की नाही? असेही राज ठाकरे म्हणाले.