TRENDING:

नायगाव उड्डाण पुलावरून दुचाकी कोसळली, तरणाबांड पोरगा जागेवर गेला

Last Updated:

Road Accident News: दुभाजकाला गाडी धडकून थेट पुलावर खाली पडल्याने दुचाकीस्वाराचा जागेवर मृत्यू झालाय.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
विजय देसाई, प्रतिनिधी, नायगाव : नायगाव उड्डाण पुलावरून भरधाव वेगाने जाणार्‍या दुचाकीचा अपघात झाला. पुलाच्या कठड्याला धडक दिल्याने दुचाकी थेट खाली पडली. या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. तर मागे बसलेला मित्र गंभीर जखमी झाला आहे.
नायगाव अपघात
नायगाव अपघात
advertisement

रोहित सिंग (वय २०) आणि त्याचा मित्र विघ्नेश कटकिरवा (वय १९) हे दोघे मुंबईहून नायगाव पश्चिमेच्या उमेळा येथे जाण्यासाठी दुचाकीवरून (एमएच ०४ केव्ही ९६०७) निघाले होते. रविवारी ते नायगाव उड्डाणपूलावरून जात असताना दुचाकीचे नियंत्रण सुटले आणि दुचाकी डाव्या बाजूच्या सिमेंटच्या कठड्याला धडक देऊन थेट खाली पडली.

या अपघातात दुचाकी चालक रोहित सिंग याचा जागीच मृत्यू झाला तर मागे बसलेला विघ्नेश किटकरवा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर वसईच्या कार्डिनल ग्रेशस रुग्णालयात उपचार सुरू आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दगडूशेठ बाप्पाला 21 पालेभाज्यांची आरास, चतुर्थीचा डोळ्यांचं पारणं फेडणारा Video
सर्व पहा

या प्रकरणी माणिकपूर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. मयत रोहीत हा गोरेगाव येथे राहणारा होता. जखमी विघ्नेश नायगाव येथील रहिवाशी आहे. दुचाकी उड्डाणपूलावरून खाली पडून झालेला हा तिसरा अपघात आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नायगाव उड्डाण पुलावरून दुचाकी कोसळली, तरणाबांड पोरगा जागेवर गेला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल