नेमकं काय घडलं?
आज राज्यातील अनेक जिल्ह्यात मराठा समाजाकडून रस्त्यावर उतरत रास्तारोको आंदोलन करण्यात आलं. नांदेड जिल्ह्यातही काही ठिकाणी मराठा समाजाने आंदोलन केलं. हदगावहुन नांदेडकडे एक खाजगी बस येत होती. ही बस मराठा समाजाच्या आंदोलकांनी अडवली. यावेळी मराठा आंदोलकांसोबत महिलांची झटापट झाली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या खाजगी बसमधील एका महिलेच्या आजारी मुलाला नांदेड येथे रुग्णालयात नेण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु, मराठा आंदोलकांनी हदगाव तालुक्यातील मनाठा पाटी जवळ रास्त्यात बस अडवली. त्यामुळे महिला संतप्त झाल्या. विनंती करुनही बस जाऊ दिली जात नसल्याने या महिलेसोबत असलेल्या इतर महिला बसच्या खाली उतरल्या, त्यांची आंदोलकांसोबत झटापट झाली.
advertisement
वाचा - जरांगेंवर आरोप करणाऱ्या बारस्करांना मोठा धक्का, खळबळजनक माहिती समोर
लातूरमध्ये आंदोलक-पोलीस यांच्यात बाचाबाची
लातूर शहरात ही मराठा आंदोलकांच्या वतीने चक्काजाम आंदोलनाला सुरुवात झालीय , आंदोलनादरम्यान अडकलेल्या गाड्या सोडण्यावरून पोलिसांसोबत मराठा आंदोलकांची बाचाबाची झालीय. तर पोलिसांसोबत हुज्जत घालणाऱ्या मराठा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलय . पोलिस अधीक्षक यांची गाडी या चक्का जाम आंदोलनात अडकली होती पोलिसांनी वाहने काढत पोलिस अधीक्षक यांची गाडी बाहेर काढली , तर पोलिस अधीक्षकांनी नागरिकांना अडचण होत असल्यासच सांगत मराठा आंदोलकांना विनंती केली आहे , मात्र आंदोलक आंदोलन करण्यावर ठाम आहेत . ठिय्या मांडत चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे. यामुळे वाहनांच्या लांब लांब रांगा लागलेल्या आहेत.