Ajay Baraskar : जरांगेंवर आरोप करणाऱ्या बारस्करांना मोठा धक्का, खळबळजनक माहिती समोर
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
अजय बारस्कर यांचा देहू आणि देहू संस्थानशी कोणताही संबंध नसल्याचे सांगण्यात आले आहे. तर देहू संस्थान हे मनोज जरांगे यांच्या पाठीशी असल्याचे देखील सांगण्यात आले आहे.
गणेश दुडम, देहू : मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप करणाऱ्या अजय बारस्कर यांनी जरांगे यांना उपोषण सोडण्यासाठी संत तुकाराम महाराजांचा आदेश आहे असे वक्तव्य केले. त्याचप्रमाणे बारस्कर यांनी मी देहूतून आलो आहे असे देखील सांगितले. त्यावर आता जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या वंशजांकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. बारस्कर हा माणूस देहूतील नसून त्याला कोणत्याही प्रकारे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या नावाचा स्वतःच्या हितासाठी वापर करण्याचा अधिकार नाही असं स्पष्ट करण्यात आलंय.
अजय बारस्कर यांचा देहू आणि देहू संस्थानशी कोणताही संबंध नसल्याचे सांगण्यात आले आहे. तर देहू संस्थान हे मनोज जरांगे यांच्या पाठीशी असल्याचे देखील सांगण्यात आले आहे. कार्ला फाटा येथे रास्ता रोको आंदोलन झाल्यानंतर मावळ मधील मराठा आंदोलक हे देहूतील संत तुकाराम महाराजांच्या वंशजांना भेटण्यासाठी गेले. मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी वक्तव्य करणाऱ्या अजय बारस्कर यांचा निषेध देहू संस्थान कडून व्यक्त करण्यात आला.
advertisement

बारस्करांवर हल्ल्याचा प्रयत्नाचा पोलिसांना संशय
दरम्यान, अजय महाराज बारस्कर आझाद मैदानाजवळील प्रेस क्लब येथे मनोज जरंगे पाटील यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेणार होते. मात्र ती प्रेस रद्द करून ते चर्चगेटजवळील हॉटेल ऑस्ट्रियामध्ये थांबले. यावेळी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. अजय बारस्कर यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या आरोपानंतर अजय बारस्कर यांनी आपल्याला फोनवर धमक्या येत असल्याचं सांगितलं होतं. सध्या अजय बारस्कर हे मुंबईत थांबलेले आहे. चर्चेगेट परिसरातील आझाद मैदानाजवळ असलेल्या हॉटेल ऑस्ट्रिया इथं ते मुक्कामी आहे. या ठिकाणी संध्याकाळी 6.45 वाजेच्या सुमारास 5 ते 6 जणांनी बारस्कर यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 24, 2024 2:37 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ajay Baraskar : जरांगेंवर आरोप करणाऱ्या बारस्करांना मोठा धक्का, खळबळजनक माहिती समोर