नांदेड जिल्हयात मराठा आरक्षणासाठी एकाच दिवसात दोन आत्महत्या
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आज नांदेड जिल्ह्यात एकाच दिवशी दोन बळी गेले. काल पहाटे हदगाव तालुक्यातील वडगाव तेथील 24 वर्षीय तरुण शुभम पवार याने विष पिऊन आत्महत्या केली होती. आज रात्री शुभमच्या पार्थिवावर अंत्य संस्कार करण्यात आले. शुभमच्या चितेची आग थंड होण्यापूर्वी आणखी एकाने नांदेडमध्ये आत्महत्या केली. नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील भोपळा येथे एका शालेय विद्यार्थ्यांने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. इयत्ता दहावीत शिकणाऱ्या 17 वर्षीय ओमकार बावने याने विहीरीत उडी घेउन आत्महत्या केली.
advertisement
वाचा - 'धनगर समाज रस्त्यावर उतरल्यास सरकार जबाबदार; आमदार गोपीचंद पडळकरांचा इशारा, तारखही सांगितली
आत्महत्या करण्यापूर्वी विहिरीवर लिहून ठेवलेल्या चिठ्ठीमध्ये माझे आई वडील मोल मजुरी करून आम्हाला शिक्षण शिकवत होते. पण त्यांची परिस्थिती मला पाहवत नव्हती. आणि मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने मी विहिरीत उडी मारून जीव देत आहे, असं त्याने चिठ्ठीत लिहिलं आहे. या प्रकरणी रामतीर्थ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली. सद्या नायागव ग्रामीण रुग्णालयात मतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. या दोन आत्महत्यांमुळे उद्या नांदेड जिल्हात मराठा आरक्षण आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे.