खासदारावर आमदार भारी
या निवडणुकीत खासदार प्रताप पाटील यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. तर मेव्हण्याला हरवण्यासाठी आमदार श्याम सुंदर शिंदे यांनी देखील मोठी ताकद लावली होती. शेकाप, काँगेस, उबाठा गट अशी महाविकास आघाडी करुन आमदार शिंदे मैदानात उतरले होते. त्यांनी एक हाथी बाजी मारली. विजयी मिरवणुकीत आमदार शिंदे यांनी अनेकवेळा दंड थोपटले. मी खरा पहिलवान असुन यापुढे कुठलीच निवडणूक खासदार चिखलीकर यांना जिंकू देणार नाही, असे आव्हान आमदार शिंदे यांनी दिले आहे.
advertisement
वाचा - 'सोबत राहून अफजलखानासारखी मिठी..' बच्चू कडू यांचा भाजपला थेट इशारा, म्हणाले..
नांदेडमध्ये झालेल्या सहा बाजार समितीच्या निवडणुकीचे निकाल हाती आले. त्यात मुखेड वगळता भाजपा, महायुतीचा मोठा पराभव झाला. पाच बाजार समित्यामध्ये महाविकास आघाडीने दणदणीत विजय मिळवला आहे. मुखेडमध्ये 18 पैकी 12 जागा जिंकून भाजपाने बहुमत मिळवलं. उमरीमध्ये 18 पैकी 18 जागा महाविकास आघाडीने जिंकल्या. बीलोलीत 18 पैकी 17 जागा आघाडी आणि एक जागा भाजपाला मिळाली. कोंडलवाडी येथे देखील 18 पैकी 17 जागा आघाडी आणि एक जागा भाजपान जिंकली. माहुरमध्ये 18 पैकी 14 जागा शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि उठाबा गटाच्या आघाडीने जिंकल्या तर 4 जागा भाजपा, अजित पवार गटाने जिंकल्या. जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या लोहा बाजार समितीत भाजपा खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या गटाचा पराभव झाला. चिखलीकर यांचे दाजी आमदार श्याम सुंदर शिंदे यांच्या नेतृत्वातील आघाडीला 18 पैकी 16 जागा मिळाल्या.
निकाल
उमरी - 18 पैकी 18 जागा महावि
बिलोली - 18 पैकी 17 जागा महावि , 1 भाजपा
कोंडलवाडी 18 पैकी 17 जागा महावि , 1 जागा. भाजपा
माहुर - 18 पैकी 14 जागा राष्ट्रवादी उठाबा आघाडी , 4 जागा भाजपा - काँगेस युती
लोहा - 18 पैकी 16 महावि, भाजपा 2
मुखेड - 18 पैकी 12 जागा भाजपा महावी 6