advertisement

Bachchu Kadu : 'सोबत राहून अफजलखानासारखी मिठी..' बच्चू कडू यांचा भाजपला थेट इशारा, म्हणाले..

Last Updated:

Bachchu Kadu : भाजप व आमदार बच्चू कडू यांच्यातील संघर्ष शिगेला पोहचला असल्याचे पाहायला मिळत आहे.

बच्चू कडू यांचा भाजपला थेट इशारा
बच्चू कडू यांचा भाजपला थेट इशारा
अमरावती, 8 ऑक्टोबर (संजय शेंडे, प्रतिनिधी) : आगामी 2024 ची लोकसभा निवडणूक भाजपसाठी महत्त्वाची आहे. मात्र, असं असताना भाजप आणि मित्र पक्षांमधील संघर्ष हा शिगेला पोहोचत असल्याचं दिसत आहे. शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा देणारे अचलपूर मतदार संघाचे आमदार बच्चू कडू यांच्या मतदारसंघात भाजपचे नेते कार्यकर्ते आपल्याला पाडण्यासाठी योजना आखत असल्याचं बच्चू कडू यांना वाटत आहे. यावरुन हा संघर्ष आता टोकाला जात आहे.
भाजप खासदारांनी बच्चू कडू यांना डिवचलं
बच्चू कडू हे चारदा सतत निवडून आलेले आहेत. आमदार कडू यांना अहंकार, गर्व आहे. मात्र, गर्वाचे घर कधी खाली असते. आपल्याला कोणी पाडणार नाही, या भ्रमात बच्चू कडू यांनी राहू नये. जनताच पाडत असते, असे वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी काल (शनिवार) केले.
advertisement
आमदार बच्चू कडू यांचा जोरदार पलटवार
खासदार अनिल बोंडे यांच्या वक्तव्यावर गप्प बसतील ते बच्चू कडू कसले? त्यांनीही बोंडे यांना जोरदार प्रत्त्युत्तर दिले आहेत. कडू म्हणाले, की अनिल बोंडे तुम्ही नवख्या उमेदवाराकडून पडले. त्यामुळे जनतेने दाखवलं आहे, गर्व कोणाला आहे. अनिल बोंडे कसे पडले हे मला माहित आहे, अनिल बोंडे यांनी मला फोन केला होता, आम्हाला पाठिंबा द्या, पण बच्चू कडू कधीच पाठिंब्यासाठी फोन करत नाही. मला गर्व नाही, मला शेतकरी, मजूर मतदारांवर आत्मविश्वास आहे. मी निवडून येणार हे नक्की. सोबत राहून अफजलखानासारखी मिठी मारण्याचा प्रकार भाजपने थांबवावा, असा इशाराच बच्चू कडू यांनी दिला आहे.
advertisement
देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यासोबत चर्चा करण्यापूर्वी त्यांनी इथल्या स्थानिक भाजप कार्यकर्ते मला मुद्दाम अडचण निर्माण करण्याचं काम करत आहे त्यांना थांबवलं पाहिजे. भाजप पक्ष मोठा आहे हे मान्य आहे, पण तुमच्या सोबत राहून आम्हाला पाडण्याचे मनसुबे तुम्ही जर आखत असाल तर, आमच्या हाती पण महाराष्ट्रात काहीतरी असेल ना? तुमच्यामुळे आम्ही पडू पण आम्हीही कोणाला तरी पाडण्याची ताकद ठेवू, असा थेट इशारा-बच्चू कडू यांनी भाजपला दिला आहे.
advertisement
शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा देणाऱ्या कडू आणि भाजपमधील संघर्ष मिटला नाही तर त्याचा फटका निश्चितच 2024 भाजपला बसू शकतो. त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संघर्षात लक्ष घालण्याची गरज आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अमरावती/
Bachchu Kadu : 'सोबत राहून अफजलखानासारखी मिठी..' बच्चू कडू यांचा भाजपला थेट इशारा, म्हणाले..
Next Article
advertisement
NCP Merger: अजितदादांनी सगळं ठरवलं होतं, कोण होणार होतं राष्ट्रीय अध्यक्ष, राज्यात कोणाचा चेहरा? फॉर्म्युला आला समोर
अजितदादांनी सगळं ठरवलं होतं, कोण होणार होतं राष्ट्रीय अध्यक्ष, राज्यात कोणाचा चे
  • गील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणांच्या चर

  • राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या पडद्याआड झालेल्या बैठकांची माहिती समोर येऊ लागली

  • विलीनीकरणातील राष्ट्रवादीतील सत्ता वाटपाचं सूत्र निश्चित करण्यात आल्याची माहिती

View All
advertisement