कशी घडली घटना?
नांदेड-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील चोरंबा फाटा हे दोन जिल्हे आणि तीन तालुके असलेल्या पॉईंटवर मागील काही दिवसांपासून नाकाबंदी चौकी उभारण्यात आली आहे. नागपूर मार्गाकडून येणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी करण्यात येत होती. 1 जून रोजी पोलीस कर्मचारी पिकअप क्रमांक एम. एच - 20 ई. जी.7844 या वाहनाची तपासणी करीत असताना पाठीमागून आलेला ट्रक क्रमांक आर. जे. 09 - जी. सी. 9945 ट्रकने पोलीस हवालदार राम पवार यांना उडविले. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांना राष्ट्रीय महामार्ग पोलीस केंद्र वसमत फाटा येथील रुग्णवाहिकेने ग्रामीण रुग्णालय अर्धापूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
advertisement
वाचा - पुणे हादरलं! 22 वर्षीय तरुणीला जमिनीत जिवंत गाडलं; VIDEO VIRAL
वाहन चालकावर गुन्हा दाखल
या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेड ग्रामीण यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेऊन पिकअप व ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या अपघात प्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात ट्रक आणि पिकअप या दोन्ही वाहन चालकावर आणि वाहनावर गुन्हा दाखल करण्यात आले आहे.