पुणे हादरलं! 22 वर्षीय तरुणीला जमिनीत जिवंत गाडलं; VIDEO VIRAL

Last Updated:

तरुणीला जमिनीत गाडलं. 25 ते 30 जणांनी जेसीबीच्या मदतीनं तिच्यावर माती टाकली. तरुणीला जमिनीत जिवंत गाडल्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो
चंद्रकांत फुंदे,प्रतिनिधी/पुणे :  जिल्ह्यात एका तरुणीला जमिनीत जिवंत गाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राजगड तालुक्यातील कोंढवळे गावातील ही घटना आहे. तरुणीला जमिनीत गाडलं. 25 ते 30 जणांनी जेसीबीच्या मदतीनं तिच्यावर माती टाकली. तरुणीला जमिनीत जिवंत गाडल्याचा पुण्यातील या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
22 वर्षांची ही तरुणी, जमिनीच्या वादातून तिला जमिनीत गाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. जमिनीत गाडलेल्या या तरुणीनं स्वतःच पोलिसात तक्रार दिली आहे. घटनेचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, ज्यात तरुणी कंबरेपर्यंत मातीत गाडलेली असल्याचं दिसचं आहे.
advertisement
4 जणांवर गुन्हा दाखल
तरुणीनं घडलेल्या घटनेबाबत पोलीस स्टेशनमध्ये रितसर लेखी तक्रार दिली आहे. राजगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जमिनीत गाडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी 307 प्रमाणे 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संभाजी खोपडे, तानाजी खोपडे, बाळू भोरकर, उमेश जयस्वाल अशी त्यांची नावं आहेत. या चार जणांवर जीवे मारण्याचा प्रयत्न, शिवीगाळ धमकावणं यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात 10 ते 12 जणांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
advertisement
आईनंच मुलीला जिवंत पुरलं
गेल्यावर्षी बिहारच्या पाटणामध्ये ही धक्कादायक घटना घडली होती. तीन वर्षांच्या चिमुकल्या मुलीला तिच्या जन्मदात्या आईनंच जिवंत जमिनीत पुरलं. तिने श्वास घेतल्यावर आणि हालचाल केल्यावर जमीन हालत होती. यावरूनच ही घटना उघडकीस आली.
advertisement
ही घटना कोपा मरहा नदीच्या काठावरील स्मशानभूमीतील आहे. घरगुती कामासाठी स्थानिक महिला तिथे पोहोचल्या होत्या. अचानक त्यांना एके ठिकाणची माती हालत असल्याचं दिसलं. त्यानंतर त्यांनी आरडाओरड करत ग्रामस्थांना बोलावलं. ग्रामस्थांनी याची माहिती पोलिसांना (Police) दिली. पोलिसांनी मुलीला जमिनीतून बाहेर काढलं. स्थानिक एसएचओ आणि एएसआय रवींद्र सिंह यांनी घटनास्थळाचा आढावा घेतला आणि मुलीला उपचारांसाठी सदर रुग्णालया पाठवलं. या मुलीला काही वेळापूर्वीच जमिनीत पुरण्यात आलं असावं, त्यामुळे मुलगी वाचली, असं पोलिसांचं म्हणणं आहे. या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येत आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पुणे हादरलं! 22 वर्षीय तरुणीला जमिनीत जिवंत गाडलं; VIDEO VIRAL
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement