नांदेड ते मुंबई आणि गोवा या दोन्ही विमानसेवा स्टार एअर मार्फत सुरू होत आहेत. या सेवा आठवड्यातील सातही दिवस सुरू राहणार आहेत, असे खासदार अशोक चव्हाण यांनी सांगितले.
Pune Metro : पुणेकरांनो गाडी घरी ठेवा! मेट्रोचा आणखी विस्तार होणार; किती स्थानके अन् रूट कसा?
नांदेडहून मुंबई, गोवा तासात
मुंबई- नांदेड विमान हे दुपारी 4:45 वाजता मुंबईहून उड्डाण करेल आणि सायंकाळी 5:55 वाजता नांदेडच्या श्री गुरु गोबिंदसिंगजी विमानतळावर उतरेल. तेच विमान सायंकाळी 6:25 वाजता नांदेडहून उड्डाण करून रात्री 7:35 वाजता मुंबई विमानतळावर पोहोचेल. तर गोवा-नांदेड विमान हे गोव्याच्या मोपा विमानतळावरून दुपारी 12 वाजता उड्डाण करून 1 वाजता नांदेडला पोहोचेल. परतीचे उड्डाण दुपारी 1:30 वाजता होऊन गोव्याला 2:40 वाजता पोहोचेल.
advertisement
मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांनाही लाभ
नांदेडहून मुंबई आणि गोव्यासाठी विमानसेवा सुरू झाल्याने त्याचा लाभ मराठवाड्यातील नांदेड शेजारच्या इतर जिल्ह्यांना देखील होणार आहे. नांदेड गोवा विमानसेवा सुरू झाल्याने पर्यटनाला चालना मिळणार आहे. सध्या नांदेडहून दिल्ली (हिंडन), अहमदाबाद, पुणे, बंगळुरू आणि हैद्राबाद या पाच शहरांसाठी विमानसेवा सुरू आहेत. त्यात मुंबई आणि गोवा मार्गांची भर पडल्याने नांदेडहून सात ठिकाणी विमानसेवा उपलब्ध होईल.
