Pune Metro : पुणेकरांनो गाडी घरी ठेवा! मेट्रोचा आणखी विस्तार होणार; किती स्थानके अन् रूट कसा?
Last Updated:
Pune Metro Expansion : माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावरील मेट्रोचा विस्तार लोणी काळभोर आणि पुरंदर विमानतळापर्यंत होणार आहे. राज्य सरकारने या विस्ताराची जबाबदारी महामेट्रोकडे सोपवली असून पुणेकरांसाठी ही मोठी वाहतूक सुविधा ठरणार आहे.
पुणे : पुणे शहरात गेल्या काही महिन्यात मेट्रो मार्गाचा मोठा विस्तार झाला आहे. त्यातही अन्य भागात मेट्रोचे जाळे विस्तारत असताना माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रोचा विस्तार आता लोणी काळभोर आणि पुरंदर विमानतळापर्यंत होणार आहे. करण्यात येणाऱ्या या नव्या विस्तारामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीच्या समस्येत अडकावे लागणार नाही आणि पुरंदर विमानतळापर्यंत जाणाऱ्या प्रवाशांना भविष्यात फायदा होणार आहे.
माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्प कसा असेल
पीएमआरडीए अर्थात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण सध्या माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गाचे काम वेगाने पूर्णत्वाकडे नेत आहे. हा प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारीतून राबवला जात असून एकूण 23.3 किलोमीटर लांबीच्या या मार्गावर 23 स्थानके असतील. मेट्रोमध्ये एका वेळी सुमारे एक हजार प्रवासी प्रवास करू शकतील.
advertisement
या प्रकल्पाचे सुमारे 90 टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे आणि उर्वरित काम अंतिम टप्प्यात आहे. चालू वर्षी जुलै महिन्यात मेट्रोची पहिली चाचणीही यशस्वीरीत्या घेण्यात आली. सर्व काम पूर्ण झाल्यानंतर ही मेट्रो मार्च 2026 पर्यंत प्रवाशांसाठी सुरू होण्याची शक्यता आहे.
ही मेट्रो PPP तत्त्वावर असल्यामुळे ती एकाच टप्प्यात म्हणजे माण-हिंजवडीपासून शिवाजीनगरपर्यंत सुरू करण्यात येणार आहे. या मार्गाला पुढे लोणी काळभोर आणि पुरंदर विमानतळापर्यंत विस्तार देण्याचे नियोजन पीएमआरडीएकडून करण्यात आले आहे.
advertisement
दरम्यान राज्य सरकारने आता पीएमआरडीएच्या या प्रस्तावित मेट्रो विस्ताराची जबाबदारी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडकडे (महामेट्रो) सोपवली आहे. म्हणजेच, सध्याचा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पीएमआरडीएची भूमिका समाप्त होईल आणि भविष्यातील सर्व मेट्रो विस्तार तसेच नवीन मार्ग आखणीची जबाबदारी महामेट्रोकडे असेल.
या निर्णयामुळे पुण्यातील मेट्रो नेटवर्क अधिक सोयीस्कर होणार आहे. पुरंदर विमानतळाशी थेट मेट्रो जोडणी झाल्यास प्रवाशांचा वेळ आणि प्रवास खर्च दोन्ही वाचतील. तसेच, शहराच्या बाहेरील भागातही सार्वजनिक वाहतुकीची सोय वाढेल.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 28, 2025 9:29 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Metro : पुणेकरांनो गाडी घरी ठेवा! मेट्रोचा आणखी विस्तार होणार; किती स्थानके अन् रूट कसा?


