काय आहे घटना?
नांदेड शहराजवळच्या धनगरवाडी येथील 32 वर्षीय तुकाराम कसबे या युवकाचे डुकराच्या कळपाने लचके तोडले. यात त्याचा मृत्यू झाला आहे. मयत तरुणाला क्षयरोग होता. अकरा दिवस तो शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल होता. गेल्या 9 तारखेला त्याला उपाचारानंतर सुट्टी देण्यात आली होती. आज सकाळी त्याचा मृतदेह रूग्णालय परिसरात आढळला. तो शौचालयाला गेला होता. त्याच वेळी त्याच्यावर डुकराच्या कळपाने हल्ला करत लचके तोडले. एक महिन्यापूर्वीच नांदेडच्या याच रूग्णालयात एकाच दिवशी 24 मृत्यू झाले होते. तेव्हा देखील हे प्रकरण राज्यभर गाजले होते. आता पुन्हा कचरा, घाणीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रुग्णालय परीसरात घाणीमुळे डुकराचा सुळसुळाट झाला. यात एकाचा आज डुकराच्या हल्ल्यात बळी गेला.
advertisement
नागपूरमध्येही सरकारी रुग्णालयात मृत्यूचे तांडव
महाराष्ट्रात नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरनंतर नागपूरच्या सरकारी रुग्णालयात 24 तासात 25 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती. दोन वेगवेगळ्या रुग्णालयात मिळून एका दिवसात 25 रुग्ण दगावल्याची माहिती समोर आलीय. याआधी छत्रपती संभाजीनगरमधील सरकारी रुग्णालयात 24 तासात किमान 18 मृत्यूची नोंद झाली. याआधी मराठवाड्यातील नांदेडमध्ये शंकरराव चव्हाण सरकारी मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात 30 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान 24 तासात 24 मृत्यू झाले होते. यानंतर दुसऱ्या दिवशी सात तर तिसऱ्या दिवशी सहा जणांचा मृत्यू झाला.
वाचा - 'पक्षात फूट पडली तेव्हा मलाही नेत्यांचा निरोप आला..' रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
नागपूरमध्ये मेडिकल आणि मेयो या दोन्ही रुग्णालयात मिळून 25 रुग्णांचा मृत्यू झाला होता. या दोन्ही रुग्णालयात विदर्भासह मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा या राज्यांमधून रुग्ण दाखल होत असतात. दोन्ही रुग्णालयात 1800 बेड आहेत. मेडिकल रुग्णालयात 16 तर मेयोमध्ये 9 रुग्ण गेल्या 24 तासात दगावले. यात मेडिकलमधील एकूण रुग्णांपैकी 8 रुग्ण हे अत्यवस्थ असताना खासगी रुग्णालयातून दाखल झाले होते.