TRENDING:

परदेशातील नव्हे तर नांदेडमधील बालवैज्ञानिकांनी तयार केला रोबोट, नेमकं काय काम करणार, VIDEO

Last Updated:

संस्कृती संवर्धन मंडळ संस्थेच्या छत्रपती शिवाजी हायस्कूल विभागातील नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी एक रोबोट बनविला आहे. नरसिंग पट्टेवार, ओमकार सुरकुटलावार व शिवम तोटावाड अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत. शाळेच्या अटल टिंकरिंग प्रयोगशाळेत हे विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नागेश खानापूरे, प्रतिनिधी
advertisement

नांदेड : विज्ञानात दररोज नवनवीन क्रांती घडतच असते. अशीच क्रांती घडविण्याच्या ध्यास धरलेल्या चिमुकल्या बालवैज्ञानिकांनी एक वेगळीच शक्कल लढवली आहे. शाळेत भेट देण्यासाठी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी या विद्यार्थ्यांनी पाहुण्यांचे स्वागत करणारा रोबोट तयार केला आहे.

संस्कृती संवर्धन मंडळ संस्थेच्या छत्रपती शिवाजी हायस्कूल सगरोळी येथील नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी एक रोबोट बनविला आहे. नरसिंग पट्टेवार, ओमकार सुरकुटलावार व शिवम तोटावाड अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत. शाळेच्या अटल टिंकरिंग प्रयोगशाळेत हे विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत.

advertisement

शाळेचे मुख्याध्यापक काय म्हणाले -

अटल टिंकेरिंग लॅब ही नीती आयोगामार्फत आम्हाला मिळाली आहे. याचा मुख्य उद्देश म्हणजे शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना नवनवीन संशोधन करता यावे. शालेय जीवनातच बालवैज्ञानिक तयार व्हावेत हा उद्देश आहे. विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासावर आम्ही काम करत असतो, असे या शाळेचे मुख्याध्यापक संभाजी गायकवाड म्हणाले.

पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, विद्यार्थी शिकत असलेल्या रोबोटिक्स तंत्रद्यानाचा वापर करून शाळेसाठी एखादे अनोखे उपकरण करावे ही कल्पना त्यांना सुचली. यासाठी त्यांनी इंटरनेटचा आधार घेत काही नवीन प्रयोग शोधण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांना फुलांचे गुच्छ पाहुण्यांपर्यंत पोहोचविणारा रोबोट दिसला. असाच एखादा रोबोट आपणही तयार करण्याचे त्यांनी ठरविले. यासाठी त्यांनी मार्गदर्शक म्हणून शिक्षक साईनाथ जोरगेलवार यांची मदत घेतली आणि अल्पावधीतच त्यांचे स्वप्न साकार झाले, अशी माहितीही मुख्याध्यापकांनी दिली.

advertisement

या रोबोटचे नाव ब्लूटूथ कंट्रोलर असे आहे. सध्या हा वॉकिंग मोड मध्ये आहे. हा रोबोट अटल टिंकेरिंगच्या साहाय्याने बनवला आहे. प्रत्येक कार्यक्रमांत एखादी व्यक्ती पुष्प गुच्छ देतो. यात बदल म्हणून आपण नवीन काही तरी करण्याचा संकल्प केला आणि यातून हा रोबोट तयार झाला. हे बनवण्यासाठी जवळपास 8 दिवसांचा कालावधी लागला. रोबोटिक्स तंत्रज्ञानाचा वापर करून हा रोबोट बनवला आहे. आम्ही विद्यार्थ्यांना यासंदर्भात शिक्षणही देतो, अशी माहिती या शाळेतील शिक्षक साईनाथ जोरगेलवार यांनी दिली.

advertisement

'माझी शाळा मुख्यमंत्री शाळा' या योजनेअंतर्गत शाळा पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकातील पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी अटल टिंकेरींग लॅबमध्ये तयार करण्यात आलेल्या रोबोटचा वापर करण्यात आला, असेही त्यांनी सांगितले.

Ganeshotsav Pune : तुळशीबाग मंडळाचा उपक्रम, यंदाच्या वर्षी तयार केला जगन्नाथ पुरीचा देखावा, VIDEO

विद्यार्थ्यांनी दिली ही प्रतिक्रिया -

advertisement

दर वेळेस पाहुण्यांना कोणीतरी प्लेटमध्ये पुष्पगुच्छ घेऊन येत असतो. त्यात बदल म्हणून आम्ही विचार केला की हा रोबोट तयार करावा. यात आधुनिक साहित्य वापरले आहेत, असे विद्यार्थी नरसिंग पट्टेवार याने सांगितले.

हा रोबोट बनवण्यासाठी अंदाजे 5 हजारच्या आत खर्च आल्याचे शिक्षक सांगतात. तसेच यात वापरण्यात वापरलेले साहित्य आधुनिक असून याची एक खासियत म्हणजे हे रोबोट पूर्णतः मोबाईलद्वारे ऑपरेट केला जातो. तसेच हा रोबोट ज्या संस्थेतील विद्यार्थी बनविला आहे, त्या संस्थेने अनेक वेगवेगळे उपक्रम राबवून राज्यस्तरीय पुरस्कारापर्यंत पोहचण्याची इच्छा शक्ती दाखवून दिली आहे.

लेझर शो डोळ्यांसाठी प्रचंड घातक, नेत्रतज्ञांनी सांगितली महत्त्वाची माहिती, VIDEO

अटल टिंकेरींग लॅबमध्ये दरवर्षी बदल केले जातात. मोबाईल फोनचा वापर कसा करायचा हे विद्यार्थ्यांना शिकवले जाते. यामुळे मुलांमधील स्किल डेव्हलप होत असतात. याच विचारातून मुलांनी हा रोबोट तयार केला आहे, असे शैक्षणिक समन्वयिका श्रद्धा देशमुख यांनी सांगितले.

सध्या हा रोबोट फक्त चालणारा झाला आहे आणि पुढे त्याला बोलणारा करण्याचा या विद्यार्थ्याचा मानस आहे. यातील सेन्सर आधुनिक असून या रोबोटमध्ये येणाऱ्या काळात अनेक बदल केले जाऊ शकतात.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/नांदेड/
परदेशातील नव्हे तर नांदेडमधील बालवैज्ञानिकांनी तयार केला रोबोट, नेमकं काय काम करणार, VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल