मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाची माफी मागावी अन्यथा त्यांची हिंगोली येथील सभा उधळून लावू असा इशारा स्वराज्य पक्षाच्या पदाधिकाऱ्याने दिला आहे. तर धमक असेल तर सभा उधळूनच दाखवा, बघून घेऊ असे आव्हान मेळाव्याच्या संयोजकांनी दिले आहे. त्यामुळे ओबीसी मेळाव्यापूर्वीच मराठा-ओबीसी समाजात ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
उद्या 26 नोव्हेंबर रोजी हिंगोली येथे ओबीसी महाएल्गार मेळावा होणार आहे. या मेळाव्याला मंत्री छगन भुजबळ उपस्थित राहणार आहेत. मात्र, छगन भुजबळ हे जरांगे पाटील आणि मराठा समाजाबद्दल खालच्या पातळीवर बोलत आहेत. त्यांनी मराठा समाजाची माफी मागावी अन्यथा त्यांची हिंगोली येथील सभा उधळून लावू असा इशारा स्वराज्य पक्षाचे राज्य उपाध्यक्ष माधव देवसरकर यांनी दिला आहे.
advertisement
देवसरकर यांना ओबीसी नेत्यांनी जश्यास जसे उत्तर दिले आहे. धमक असेल तर भुजबळ यांची सभा उधळून दाखवाच, बघू पुढे काय करायचे ते. आम्ही काही हात टेकून नाही, असे प्रतिआव्हान ओबीसी महाएल्गार मेळाव्याचे मुख्य संयोजक डॉ. डी. बी चव्हाण यांनी दिले आहे. मेळाव्यापूर्वी स्थानीक पातळीवर आव्हान, प्रतिआव्हान दिले जात असल्याने मराठा आणि ओबीसी समाजात ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
वाचा - मराठा आंदोलन दगडफेक प्रकरणात अटकेत असलेल्या बेदरे राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, जेम्स लेन प्रकरणातही होता जेलमध्ये!
ओबीसी-मराठा आमने सामने
एकीकडे मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी उपोषण करतायेत. मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट आरक्षण द्यावे अशी देखील मागणी आता मराठा समाजाकडून जोर धरी लागली आहे. याला मात्र ओबीसी नेते म्हणून ओळखले जाणारे छगन भुजबळ विरोध करताना दिसतायेत. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावे अशी भूमिका छगन भुजबळ यांनी घेतली आहे. या भूमिकेला आता मराठा समाजाकडून विरोध होऊ लागला आहे. त्यामुळे राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष भेटतो की काय हे आता येणारा काळच ठरवेल.