maratha reservation : मराठा आंदोलन दगडफेक प्रकरणात अटकेत असलेल्या बेदरे राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, जेम्स लेन प्रकरणातही होता जेलमध्ये!

Last Updated:

पोलिसांवर झालेल्या दगडफेक प्रकरणी पोलिसांनी पहिली मोठी कारवाई केली. या प्रकरणी ऋषिकेश बेदरेसह 3 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

मनोज जरंगे यांच्या उपोषण आणि आंदोलनात पहिल्या दिवसापासून सहभागी
मनोज जरंगे यांच्या उपोषण आणि आंदोलनात पहिल्या दिवसापासून सहभागी
रवी जैस्वाल, प्रतिनिधी
जालना, 26 नोव्हेंबर : जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी येथे झालेल्या लाठीहल्ला आणि दगडफेक प्रकरणी पोलिसांनी आता कारवाईला सुरुवात केली आहे. या प्रकरणी मनोज जरांगे पाटील यांच्या अत्यंत जवळच्या सहकार्यांना पोलिसांनी अटक केली आहे. ऋषिकेश बेदरेंसह तिघांना पोलिसांकडून अटक केली आहे. या आरोपींना 2 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीची शिक्षा सुनावली आहे.
जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी येथे लाठीहल्ला आणि पोलिसांवर झालेल्या दगडफेक प्रकरणी पोलिसांनी पहिली मोठी कारवाई केली. या प्रकरणी ऋषिकेश बेदरेसह 3 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. अंतरवाली सराटी येथे 1 सप्टेंबर रोजी मराठा आंदोलक आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री पाहायला मिळाली होती.. यात पोलिसांकडून लाठीहल्ला तर आंदोलकांकडून दगडफेक करण्यात आली होती. या प्रकरणी मनोज जरांच्या यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा तपास करत असताना गोंदी शिवारातून पोलिसांनी अटकेची पहिली कारवाई केली आहे. यामध्ये आरोपी ऋषिकेश कैलाश बेदरे याचे पहिले नाव असून तो मुळचा बीड जिल्ह्यातल्या गेवराई शहरातला रहिवासी आहे.
advertisement
कोण आहे ऋषिकेश बेदरे?
- ऋषिकेश कैलास बेदरे ( 36 वर्ष)
(तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी, अजित पवार गट, गेवराई )
- मूळ - गेवराई शहरातील रहिवाशी
- प्रत्येक सामजिक चळवळीत सक्रीय सहभाग
- मनोज जरंगे यांच्या उपोषण आणि आंदोलनात पहिल्या दिवसापासून सहभागी
advertisement
- जेम्स लेन प्रकरणात भंडारकर इन्स्टिट्युट तोडफोड प्रकरणात त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी तीन महिने जेलमध्ये गेला होता( मात्र निर्दोष सुटका )
- प्रत्येक मराठा आंदोलन आणि मोर्चामध्ये सहभाग.
- संभाजीराजे यांच्या आझाद मैदानातील आंदोलनात सहभागी
- राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अमरसिंह पंडित यांचे निकटवर्ती
- पाच वर्षांपूर्वी बदामराव पंडित गटात सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम
advertisement
- ऋषिकेश बेदरे याच्या बंधूचे गेवराई शहरात आडत दुकान आहे. तसंच गेवराईजवळ शेती आहे.
ऋषिकेश बेदरे याच्यासह तीनही आरोपींना न्यायालयात हजर केलं असता अंबड आणि जिल्हा अप्पर न्यायालयानं त्यांना 2 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीची शिक्षा सुनावली. दरम्यान, अंतरवाली सरटी दगडफेक प्रकरणी पोलिसांनी केलेली ही पहिली कारवाई असून यामध्ये आणखी मराठा आंदोलकांना अटक होण्याची शक्यता आहे.
advertisement
कुणाला झाली अटक?
अंतरवाली सराटीत मराठा आंदोलनादरम्यान झालेल्या दगडफेक प्रकरणी चार जणांना पोलिसांनी अटक केली. ऋषिकेश बेदरे, शनिदेव शिरसट, कैलास सुखसे याच्यासह निलेश बळीराम राठोड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहे. दगडफेक प्रकरणी गोंदी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याअनुषंगाने तपास करत असताना गोंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऋषिकेश बेदरेसह तीन जण पोलिसांना मिळून आले.
advertisement
कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी आरोपींना अंबड येथील पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता ऋषिकेश बेदरे यांच्याजवळ एक गावठी पिस्तुल आणि जिवंत काडतुसं सापडली. दरम्यान पोलिसांनी या चारही जणांना अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
maratha reservation : मराठा आंदोलन दगडफेक प्रकरणात अटकेत असलेल्या बेदरे राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, जेम्स लेन प्रकरणातही होता जेलमध्ये!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement