गोळीबार करुन पैसे लुटणारे दोघे शहराजवळच्या असर्जन भागात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांची पथकं त्या ठिकाणी पोहचली. पोलिसांना पाहून दोन्ही आरोपींनी पळ काढला. पोलिसांनी पाठलाग सुरू केला. तेव्हा एका आरोपीने पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. पोलिसांनी देखील प्रतिउत्तरात गोळीबार केला. एक गोळी एका आरोपीच्या पायाला लागली. पोलिसांनी त्या दोघांनाही अटक केली आहे. हरदीप सिंघ धिल्लोन हा आरोपी नांदेड शहरातील रहिवाशी असुन रोहीत कौडा आणि सरप्रीत सिंघ सतोहा हे दोघे पंजाब राज्यातील रहिवाशी आहेत. आरोपीकडून लुटलेले चाळीस हजार रूपये, एक पिस्टल, दोन दुचाकी असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. जखमी आरोपीला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या तीनही आरोपींवर यापूर्वी काही गुन्हे दाखल आहेत का याबाबत आता पोलीस अधिक तपास करत आहेत.
advertisement
वाचा - पत्नीने थंड जेवण दिल्यानं पतीचं पंख्याला ओढणी बांधत कांड, तेव्हाच पोलीस आले, अन्
कसा घडला गुन्हा?
मंगळवारी सायंकाळच्या सुमारास बाईकवरून आलेल्या या दोघांनी रवींद्र जोशी यांच्याकडे असलेल्या पैशांची पिशवी खेचली. पैसे लुटताना रवींद्र जोशींनी प्रतिकार केला, यावेळी त्यांच्यात आणि आरोपींमध्ये झटापट झाली. यात रवींद्र जोशी यांच्या हाताल एक आणि पायाला एक गोळी लागली. जोशींकडे असलेले 40 हजार रुपये घेऊन आरोपी दुचाकीवरून पसार झाले. हल्ल्यात जखमी झालेल्या रवींद्र जोशी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना घडत असताना आवाज झाल्याने जवळील एका इमारतीवरुन या घटनेचे मोबाईलमध्ये चित्रिकरण करण्यात आले होते. हा व्हिडीओ पोलिसांच्या तपासासाठी महत्त्वाचा ऐवज ठरला.