यात बहुतांशी पदाधिकारी आणि नेते हे बंडखोर आहेत. यंदाच्या महापालिका निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने भाजपच्या अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरी करणारे, तसेच अपक्ष निवडणूक लढणारे किंवा इतर पक्षांकडून निवडणूक लढवणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई नाशिकच्या राजकीय इतिहासातील सर्वात मोठी हकालपट्टी मानली जात आहे.
नाशिक महापालिका निवडणुकीत पक्षशिस्त मोडून अधिकृत उमेदवारांविरोधात निवडणूक लढवणाऱ्या 20 माजी नगरसेवकांसह एकूण 54 जणांना भाजपने पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. विशेष म्हणजे, या यादीत माजी महापौरांचाही समावेश असल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
advertisement
कुणा कुणाची हकालपट्टी केली?
या कारवाईत माजी महापौर अशोक मुर्तडक, माजी सभागृह नेते शशिकांत जाधव, सतीश सोनवणे व कमलेश बोडके, माजी गटनेते दिलीप दातीर, अनिल मटाले, माजी नगरसेवक पुनम सोनवणे, मिरा हांडगे, सुनीता पिंगळे, अंबादास पगारे, अलका अहिरे. रुची कुंभारकर, मुकेश शहाणे, पंडीत आवारे, दामोदर मानकर, कन्हय्या साळवे, वंदना मनचंदा, शीला भागवत, नंदीनी जाधव, बाळासाहेब पाटील, राजेश आढाव, जितेंद्र चोरडीया, सचिन मोरे, अमित घुगे, ज्ञानेश्वर काकड, ज्ञानेश्वर पिंगळे, चारुदत्त आहेर, तुषार जोशी, सचिन हांडगे, प्रकाश दिक्षीत, रतन काळे, ऋषीकेश आहेर, ऋषीकेश डापसे, कैलास अहिरे, सतनाम राजपूत, गणेश मोरे, किरण गाडे, मंगेश मोरे, शाळिग्राम ठाकूर, कल्पेश ठाकूर, मनोज तांबे, शरद शिंदे, शरद इंगळे, प्रभा काठे, स्मिता बोडके, योगिता राऊत, बाळासाहेब घुगे, शंकर विधाते, प्रेम पाटील, रत्ना सातभाई, सविता गायकर, राहुल कोथमिरे, शीतल साळवे, एकनाथ नवले यांचा समावेश आहे.
