TRENDING:

सकाळी नाशिकची मिसळ अन् दुपारी कोलकात्यात बिर्याणी! आता 28 तासांचा प्रवास फक्त 3 तासांत

Last Updated:

नाशिक ते कोलकाता थेट विमानसेवा मार्च ते ऑक्टोबरदरम्यान सुरू होण्याची शक्यता, इंडिगो व एअर इंडिया तयार, नितीन सिंग यांची घोषणा, बंगाली कल्चर असोसिएशनचा पाठपुरावा.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नाशिकची मिसळ म्हणजे अनेकांसाठी प्रेम, सकाळी सकाळी पोटभरीचा नाश्ता मिसळ खायची आणि नंतर दुपारी भरपेट जेवायला कोलकात्याला उतरायचं. आता ते अगदी सहज शक्य होणार आहे. त्याचं कारण म्हणजे 28 तासांचा प्रवास आता केवळ 3 तासांत होणार आहे. नाशिकहून थेट कोलकाता विमानसेवा सुरू होत आहे. त्यामुळे तुम्ही अगदी बिनधास्त फिरायचा प्लॅनही करू शकता. सलग दोन तीन दिवस सुट्ट्या असतील तर तुम्ही नाशिक किंवा कोलकाता फिरायचा प्लॅनही सहज करू शकता.
News18
News18
advertisement

नाशिककरांसाठी मोठी बातमी आहे. नाशिक ते कोलकाता अशी थेट विमानसेवा येत्या मार्च ते ऑक्टोबर दरम्यान सुरू होण्याची दाट शक्यता असून, नाशिक विमानसेवेचे प्रमुख नितीन सिंग यांनी ही आनंदाची बातमी दिली. नाशिक ते कोलकाता थेट प्रवास करता यावा, ही सुमारे पन्नास हजार बंगाली बांधवांची जुनी मागणी आता मार्गी लागताना दिसत आहे. विशेष म्हणजे, नाशिकमध्ये गेल्या तीन-चार पिढ्यांपासून बंगाली समाज गुण्यागोविंदाने नांदतोय.

advertisement

व्यापार असो वा शिक्षण, इथल्या मातीशी या समाजाचं घट्ट नातं विणलं गेलंय. मात्र, कोलकत्याला जायचं म्हटलं की पुणे किंवा मुंबई गाठणं, तिथल्या ट्रॅफिकमधून विमानतळ गाठणं आणि मग प्रवासाचा घाट घालणं, यात प्रवाशांचा खूप वेळ आणि पैसा खर्च व्हायचा. हाच त्रास वाचवण्यासाठी 'बंगाली कल्चर असोसिएशन'ने गेल्या दोन वर्षांपासून या थेट सेवेसाठी मोठा पाठपुरावा केला, ज्याला आता यश येताना दिसत आहे.

advertisement

या विमानसेवेसाठी एअर इंडिया, इंडिगो आणि अकासा या कंपन्यांकडे प्रस्ताव पाठवण्यात आले होते. त्यापैकी इंडिगो आणि एअर इंडियाने या मार्गासाठी हिरवा कंदील दाखवल्याने आता नाशिकच्या धावपट्टीवरून कोलकत्याचं विमान लवकरच उडताना दिसेल. बंगाली कल्चर असोसिएशनच्या पहिल्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात जेव्हा नितीन सिंग यांनी ही घोषणा केली, तेव्हा उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान होतं.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लहान मुलांसाठी क्युट बॅग्स, 100 रुपयांत करा खरेदी,मुंबईतील हे ठिकाण माहितीये का?
सर्व पहा

मुंबई-कोलकाता 'दुरांतो सुपरफास्ट' एक्स्प्रेसला नाशिक रोड स्थानकावर थांबा मिळावा, यासाठी खासदार राजाभाऊ वाजे यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. जर विमान आणि रेल्वे असे दोन्ही पर्याय उपलब्ध झाले, तर नाशिकमधील पर्यटनालाही मोठी चालना मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. मुहू्र्त मिळाला आहे खरा मात्र आता प्रत्यक्षात विमानसेवा कधी सुरू होणार ते पाहावं लागणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सकाळी नाशिकची मिसळ अन् दुपारी कोलकात्यात बिर्याणी! आता 28 तासांचा प्रवास फक्त 3 तासांत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल