कुंभमेळा अधिक दीर्घकालीन आणि नियोजित स्वरूपात पार पडणार आहे. यामध्ये 3 मुख्य शाही स्नान आणि 42 पर्व स्नान समाविष्ट असणार आहेत. शाही स्नान जुलै ते सप्टेंबर दरम्यान दीड महिन्याच्या कालावधीत पार पडणार आहेत.
आज नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कुंभमेळा बैठक पार पडली. या बैठकीत 13 आखड्यांचे साधू महंत, प्रमुख शासकीय अधिकारी उपस्थित होते. त्याशिवाय, मंत्री गिरीश महाजन, दादा भुसेही उपस्थित होते. आजच्य बैठकीत कुंभमेळ्यातील शाही स्नानाच्या तारखांसोबत साधुग्राम, गोदावरी नदी प्रदूषण, कुंभ निधी, प्राधिकरणातील समावेशाबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
advertisement
>> सिंहस्थ कुंभमेळ्याच्या महत्त्वाच्या तारखा कोणत्या?
31 ऑक्टोबर 2026 दुपारी 12 वाजून 2 मिनिटांपासून कुंभमेळाला सुरुवात होणार आहे.
ध्वजारोहण- 31 ऑक्टोबर 2026
समाप्ती - 24 जुलै 2028
नगर प्रदक्षिणा 29 जुलै 2027
प्रथम अमृत स्नान 2 ऑगस्ट 2027
द्वितीय अमृत स्नान 31 ऑगस्ट 2027
तृतीय अमृत स्नान 11 सप्टेंबर 2027
ध्वज अवतरण पर्वकाळ 24 जुलै 2028
>> कुंभमेळा मध्ये होणाऱ्या अमृत्स्नान तारखा जाहीर
त्रंबकेश्वर अमृतस्नान तारीख जाहीर
ध्वजारोहण करून कुंभ पर्वाला सुरुवात
पहिले अमृस्नान -2-08-2027
द्वितीय अमृस्नान - 31-08- 2027
तृतीय अमृस्नान - 12- 09-2027
नाशिक कुंभ अमृतस्नान तारीख
31-10-2026 ध्वजारोहण करून कुंभ पर्वाला सुरुवात
पहिले अमृस्नान -2-08-2027
द्वितीय अमृस्नान - 31-08- 2027
तृतीय अमृस्नान - 11- 09-2027
शाही स्नान नव्हे आता अमृत स्नान...
दरम्यान, कुंभमेळ्यात होणाऱ्या प्रमुख स्नानाला शाही स्नान न म्हणता अमृत स्नान म्हणून संबोधण्यात येणार आहे. शाही स्नान हा शब्द मुघल काळाशी संबंधित आहे. त्यामुळे आता शाही ऐवजी अमृत हा शब्द वापरण्याची मागणी महंत राजेंद्र दास महाराज यांनी केली. गोदावरी नदीच्या प्रदूषणाच्या मुद्द्यावर कठोर पावले सरकारने उचलावे, कुंभमेळा प्राधिकरण घोषित करावे, अशी मागणीही त्यांनी केली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या बैठकीआधी त्यांनी माध्यमांशी बोलताना ही मागणी केली.