TRENDING:

Nashik Loksabha Result : नाशिककरांची कोणाच्या शिवसेनेला साथ? मशाल पेटली की बाण चालला? पाहा निकाल

Last Updated:

ठाकरे गटाच्या राजाभाऊ वाजे यांनी विजयी आघाडी घेतली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या हेमंत गोडसे यांना महायुतीकडून उमेदवारी देण्यात आली होती. तर महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे आणि अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांच्यात प्रमुख लढत होती. निवडणुकीचा निकाल आता जवळपास स्पष्ट झाला आहे. नाशिककरांनी ठाकरेंच्या शिवसेनेला साथ दिली आहे.
राजाभाऊ वाजे आणि हेमंत गोडसे
राजाभाऊ वाजे आणि हेमंत गोडसे
advertisement

ठाकरे गटाच्या राजाभाऊ वाजे यांनी विजयी आघाडी घेतली आहे. वाजे यांनी 1 लाख 81 हजार 763 इतकी मतं घेत 38 हजार 301 मतांची आघाडी घेतली आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत झालेल्या मतमोजणीतून ही आकडेवारी समोर आली आहे. महायुतीच्या हेमंत गोडसे यांना 143462 मतं मिळाली आहेत. याशिवाय अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांमी 21220 इतकी मतं मिळाली आहेत.

advertisement

Jalgaon Loksabha Result : जळगावच्या मतदारांची पुन्हा मोदींना साथ, स्मिता वाघ मोठ्या मताधिक्याने विजयी

नाशिक लोकसभेसाठी सरासरी 72.24 टक्के मतदान झालं होतं. इतर निवडणुकांपेक्षा या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढलेला होता. याचा फायदा नेमका कोणाला झाला हे आता समोर आलं आहे. या मतदारसंघात महाविकासआघाडी आणि महायुतीत काट्याची टक्कर होणार असल्याचं म्हटलं जात होतं. यानंतर अखेर आता निकाल समोर आला आहे.

advertisement

नाशिक मतदारसंघाचा इतिहास

नाशिक मतदार संघाचा इतिहास पाहिला तर हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात राहिला आहे. मात्र, यावेळी शिवसेना दोन गटात विभागली गेली आहे. त्यामुळे कोणत्या शिवसेनेच्या उमेदवाराला नाशिककर खासदार म्हणून निवडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. दोन्ही पक्षांसाठी नाशिक मतदारसंघ महत्त्वाचा आहे. गेल्या दोन्ही टर्ममध्ये शिवसेनेने इथे विजय मिळवलेला आहे. 2014 आणि 2019 च्या लोकसभेत हेमंत गोडसे यांनी विजय मिळवला होता.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nashik Loksabha Result : नाशिककरांची कोणाच्या शिवसेनेला साथ? मशाल पेटली की बाण चालला? पाहा निकाल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल