TRENDING:

Nashik Winning Candidates: नाशिक महानगरपालिका निकाल, विजयी उमेदवार; नव्या नगरसेवकांची संपूर्ण यादी

Last Updated:

Nashik Winning Candidates: नाशिक मनपा विजयी उमेदवार, नव्या नगरसेवकांची संपूर्ण यादी...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नाशिक: नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. आतापर्यंत हाती आलेल्या 31 प्रभागांच्या निकालांमध्ये भाजपने 70 जागांवर दणदणीत विजय मिळवत बहुमताच्या आकड्याकडे कूच केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकच्या विकासासाठी दिलेल्या शब्दावर नाशिककरांनी विश्वास टाकला असून, 'ब्रँड फडणवीस'चा करिश्मा येथेही पाहायला मिळाला आहे.
News18
News18
advertisement

भारतीय जनता पक्ष (BJP): 70

शिवसेना (शिंदे गट): 26

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे): 16

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार): 4

काँग्रेस: 3

मनसे: 1

अपक्ष: 1

नाशिक महानगरपालिकेतील विजयी उमेदवार यादी (Nashik Winning Candidates)

advertisement

प्रभाग क्र.
अरुपाली नन्नावरे (भाजपा) रंजना भानसी (भाजपा) दीपाली गीते (भाजपा) प्रवीण जाधव (शिवसेना)
ऐश्वर्या लाड (भाजपा) इंदुबाई खेताडे (भाजपा) रिद्धिश निमसे (भाजपा) नामदेव शिंदे (भाजपा)
प्रियंका माने (भाजपा) जुही शिंदे (भाजपा) मच्छिंद्र सानप (भाजपा) गौरव गोवर्धने (भाजपा)
मोनिका हिरे (भाजपा) सरिता सोनवणे (भाजपा) सागर लामखेडे (भाजपा) हेमंत शेट्टी (भाजपा)
कमलेश बोडके (शिंदे गट) चंद्रकला धुमाळ (भाजपा) नीलम पाटील (भाजपा) गुरमीत बग्गा (भाजपा)
चित्रा तांदळे (भाजपा) बाळू काकड (भाजपा) रोहिनी पिंगळे (भाजपा) प्रमोद पालवे (शिंदे गट)
सुरेश पाटील (भाजपा) हिमगौरी आहेर आडके (भाजपा) स्वाती भामरे (भाजपा) अजय बोरस्ते (शिंदे गट)
कविता लोखंडे (भाजपा) उषा बेंडकोळी (भाजपा) अंकिता शिंदे (भाजपा) विलास शिंदे (शिंदे गट)
भारती धिवरे (भाजपा) दिनकर पाटील (भाजपा) संगीता घोटेकर (भाजपा) अमोल पाटील (भाजपा)
१० विश्वाग नागरे (भाजपा) इंदुबाई नागरे (शिंदे गट) माधुरी बोलकर (भाजपा) समाधान देवरे (भाजपा)
११ सविता काळे (भाजपा) मानसी शेवरे (भाजपा) सोनाली भंदुरे (भाजपा) नितीन निगळ (भाजपा)
१२ राजेंद्र आहेर (भाजपा) सीमा ठाकरे (अजित पवार) हेमलता पाटील (अजित पवार) समीर कांबळे (शिंदे गट)
१३ अदिती पांडे (भाजपा) मयुरी पवार (मनसे) राहुल शेलार (भाजपा) शाहू खैरे (भाजपा)
१४ जागृती गांगुर्डे (अजित पवार) नाझिया अत्तार (काँग्रेस) समिया खान (काँग्रेस) सुफी जिन (काँग्रेस)
१५ प्रथमेश गिते (उबाठा) सीमा पवार (उबाठा) सचिन मराठे (भाजपा) -
१६ राहुल दिवे (शिंदे गट) आशा तडवी (शिंदे गट) पूजा नवले (शिंदे गट) ज्योती जोंधळे (शिंदे गट)
१७ प्रशांत दिवे (भाजपा) मंगला आढाव (उबाठा) प्रमिला मैंद (उबाठा) शैलेश ढगे (उबाठा)
१८ शरद मोरे (भाजपा) रंजना बोराडे (शिंदे गट) सुनिता भोजने (शिंदे गट) विशाल संगमनेरे (भाजपा)
१९ रुचिता साळवे (उबाठा) योगेश भोर (उबाठा) भारती ताजनपुरे (उबाठा) -
२० सतीश निकम (शिंदे गट) सीमा ताजने (भाजपा) जयश्री गायकवाड (भाजपा) कैलास मुदलियार (शिंदे गट)
२१ कोमल मेहरोलिया (भाजपा) रमेश धोंगडे (शिंदे गट) श्वेता भंडारी (भाजपा) जयंत जाचक (भाजपा)
२२ वैशाली दाणी (उबाठा) योगेश गाडेकर (उबाठा) संजिवनी हंडोरे (उबाठा) केशव पोरजे (उबाठा)
२३ रुपाली निकुळे (भाजपा) मंगला नन्नावरे (भाजपा) संध्या कुलकर्णी (भाजपा) चंद्रकांत खोडे (भाजपा)
२४ पल्लवी गणोरे (भाजपा) प्रवीण तदमे (शिंदे गट) पूनम महाले (शिंदे गट) राजेंद्र महाले (भाजपा)
२५ सुधारकर बडगुजर (भाजपा) साधना मटाले (भाजपा) कविता नाईक (शिंदे गट) मुरलीधर भामरे (उबाठा)
२६ निवृत्ती इंगोले (शिंदे गट) हर्षदा गायकर (शिंदे गट) नयना जाधव (शिंदे गट) भागवत आरोटे (शिंदे गट)
२७ प्रियंका दोंदे (भाजपा) किरण राजवाडे (अजित पवार) किरण गामणे (शिंदे गट) नितीन दातीर (शिंदे गट)
२८ दिपक दातीर (शिंदे गट) प्रतिभा पवार (भाजपा) सुवर्णा मटाले (शिंदे गट) शरद फडोळ (भाजपा)
२९ मुकेश शहाणे (अपक्ष) छाया देवांग (भाजपा) योगिता हिरे (भाजपा) भूषण राणे (भाजपा)
३० श्याम बडोदे (भाजपा) सुप्रिया खोडे (भाजपा) डॉ. दिपाली कुलकर्णी (भाजपा) अजिंक्य साने (भाजपा)
३१ भगवान दोंदे (भाजपा) माधुरी धिमसे (उबाठा) वैशाली दळवी (उबाठा) बाळकृष्ण शिरसाठ (भाजपा)

advertisement

महत्त्वाचे निकाल:

प्रभाग 16: येथे शिंदे गटाने सर्व 4 जागा जिंकून बाजी मारली.

प्रभाग 22: येथे ठाकरे गटाचे पूर्ण पॅनेल निवडून आले, जो त्यांच्यासाठी मोठा विजय ठरला.

प्रभाग 29: येथील अ-गटातून मुकेश शहाणे या एकमेव अपक्ष उमेदवाराने विजय मिळवून सर्वांचे लक्ष वेधले.

विजयाचे फॅक्टर

1. भाजपची 'एकहाती' सत्ता: प्रभाग 1 ते 4 मध्ये भाजपने सलग विजय मिळवत विजयाचा श्रीगणेशा केला. दिनकर पाटील, रंजना भानसी, हिमगौरी आडके आणि सतीश कुलकर्णी (भाजप पुरस्कृत गट) यांसारख्या मातब्बर नेत्यांनी आपापले प्रभाग राखले आहेत. विशेष म्हणजे अनेक प्रभागांमध्ये भाजपने पूर्ण पॅनेल (4-0) निवडून आणले आहे.

advertisement

2. मुख्यमंत्री फडणवीसांचा 'मॅजिक' फॅक्टर: नाशिक दत्तक घेण्याची घोषणा केल्यानंतर फडणवीसांनी नाशिकच्या मेट्रो आणि आयटी हबसाठी जे प्रयत्न केले, त्याचे फळ या निकालात दिसत आहे. शहरातील मध्यमवर्गीय आणि तरुण मतदारांनी मोठ्या प्रमाणावर भाजपला कौल दिला आहे.

3. महायुतीचा दबदबा: शिंदे गटाच्या शिवसेनेने 26 जागा जिंकून भाजपला भक्कम साथ दिली आहे. अजय बोरस्ते, विलास शिंदे आणि निवृत्ती इंगोले यांसारख्या नेत्यांनी शिंदे गटाचा भगवा फडकवत ठेवला आहे. भाजप आणि शिंदे गट मिळून नाशिकमध्ये सत्तेचे समीकरण सहज जुळवताना दिसत आहेत.

advertisement

4. ठाकरे गटाची झुंज, काँग्रेसची पिछाडी: उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने सिडको आणि सातपूर भागात 16 जागा जिंकून लढा देण्याचा प्रयत्न केला, पण तो भाजपच्या वादळासमोर अपुरा ठरला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांनाही नाशिकमध्ये मोठी कामगिरी करता आली नाही.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, कांदा दर पडलेलेच, लिंबाला काय मिळतोय भाव?
सर्व पहा

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nashik Winning Candidates: नाशिक महानगरपालिका निकाल, विजयी उमेदवार; नव्या नगरसेवकांची संपूर्ण यादी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल