नाशिक गुन्हे शाखा युनिट दोनच्या टीमने भूषण लोंढे याला नाशिकमध्ये आणले असून त्याला नाशिक कोर्टात हजर केले जाणार आहेत. भूषण लोंढे हा पोलिसाच्या ताब्यात मिळून आल्याने नाशिकमधील इतरही काही गंभीर गुन्ह्याचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून त्यात आणखी काही राजकीय गुन्हेगार पोलिसांच्या रडारवर असल्याचे बोलले जात आहे. प्रकाश लोंढे याच्या चौकशीत आणखी काही राजकीय गुन्हेगारांची नावे समोर येण्याची शक्यता आहे.
advertisement
नाव बदलून भूषण लोंढेंचा पोलिसांना चकवा, अखेर नेपाळ बॉर्डरवरून उचलला
मोबाईल डाटा तसेच इतर साथीदारांना अटक केल्यानंतर त्यांच्या चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार भूषण लोंढे यांचा तपास पोलिसांकडून करण्यात आला.नाव बदलून काही ठिकाणी भूषण लोंढे हा पोलिसांना चकवा देत होता. अखेर पोलिसांच्या गुप्त माहितीने भूषण लोंढेला पकडण्यात नाशिक पोलिसांना यश आले आहे.
नाशिक सातपूरमध्ये लोंढे गँगची मोठी दहशत
सातपूर आणि अंबड या औद्योगिक वसाहतींमध्ये कामगारांना अडवून लुटमार केली जाते, कुणाला धमकावले जाते. दुकानदारांकडून हफ्ते मागितले जातात. नकार दिला तर त्यांना मारहाण केली जाते. एकंदरित या परिसरात लोंढे गँगची दहशत मोठी आहे. राजकीय नेत्यांचा आशीर्वाद असल्याचे सांगून आम्हाला कुणीच हात लावू शकत नाही, असे लोंढे गँगमधील सदस्य अप्रत्यक्षपणे वागण्यातून सांगत होते. त्याच आरोपींचा माज नाशिक पोलिसांनी मोडला. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांची शहरातून धिंड काढली गेली.
