‘ना नफा ना तोटा’ ही संकल्पना नाशिकमधील ज्ञानेश्वर येलमामे, सुनील आरोटे, विजय शिरसाठ, विशाल कोरडे या चार मित्रांनी एकत्र येऊन सुरू केली आहे. हे चार मित्र नाशिकमध्ये स्वतःचा व्यवसाय करत आहेत तर कोणी शिक्षक आहेत आणि यामुळे कुठल्याही प्रकारचे जास्त पैसे कमावणे आणि व्यापार करणे ही यांची इच्छा नाही.
Food Business: ब्रँड सोडा, इथं फेमस आहे गावचा पेढा, आजोबांची कमाई नको, खवय्यांची गर्दी पाहा!
advertisement
महागाईच्या जमान्यात सर्वच भाव वाढत आहेत. जसे सण येतात तसे सर्वसामान्यांचे खिसे देखील रिकामे होत असतात. पूर्वी बाप्पाचा सण हा मोठ्या आनंदात साजरा होत असे. परंतु काहीच वर्षात गणेश मूर्ती 5 ते 6 हजारात विक्री होताना आपण पाहत आलो आहोत. यामुळे हातमजूर आणि सर्वसामान्य भक्त बाप्पाची हवी तशी मूर्ती आणि मुलांच्या आवडीची मोठी मूर्ती घरी नाही नेऊ शकत. या करता या लोकांसाठी आम्ही हा स्टॉल सुरू केला असल्याचं लोकल 18 सोबत बोलताना ज्ञानेश्वर येलमामे यांनी सांगितले.
ज्ञानेश्वर सांगतात, बाप्पाच्या कृपेने आम्हाला सर्व भरभरून मिळाले आहे. आमच्यामुळे कोणाच्या घरात आनंद साजरा होणार असेल तर आम्हाला पैसे हे अपेक्षित नाहीत. या करता आम्ही हे गेल्या 2 वर्षांपासून ना नफा ना तोटा केंद्र चालवत आहोत.
यांच्याकडे शाळू मातीच्या मूर्ती देखील अगदी 500 रुपयांपासून मिळत आहेत. तसेच आपण या मूर्तीला घरीच विसर्जन करू शकणार आहोत. यामुळे पर्यावरणाला देखील हानी होणार नाही तसेच श्रींची शाळू मातीची मूर्ती पाण्यात विरघळली नाही तर पैसे देखील हे परत करीत असतात. यांची ही संकल्पना नाशिककरांना खूप आवडत असल्याने आणि मूर्ती देखील आकर्षक असल्याने मोठ्या प्रमाणात बाप्पाच्या मूर्ती नागरिक या ठिकाणाहून घेत आहेत.