काय म्हणाले अजित पवार?
पावसाचे दिवस असताना देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात, त्याबद्दल सर्वांचे आभार. एक दिवस अगोदर सर्वांना आदिवासी दिनाच्या शुभेच्छा. यात्रेचे नाव जन सन्मान का ठेवले हे समजून घ्या. महिलांसाठी, युवांसाठी, शेतकऱ्यांसाठी महायुतीच्या माध्यमातून नवीन योजना आणल्या आहेत. बजेट सादर करण्यापूर्वी जनतेच्या भावना समजून घेतल्या. या योजनेचा लाभ तुम्हाला होणार आहे, तुमची सेवा करणे आमचे काम आहे. आम्ही राजे नाही जन सेवक आहोत जनतेचे सेवक आहे. माझ्या राजकीय आयुष्याला 33 वर्ष पूर्ण झाली आहेत. इतके वर्ष समाजाचे काम करत असताना शेतकऱ्यांना कर्जमाफी केली. विविध योजना आणल्या, शेतकऱ्यांना सावकार मुक्त केलं. शून्य टक्के व्याज दराने शेतकऱ्यांना पैसे दिल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
advertisement
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना किती दिवस चालणार?
रक्षा बंधननिमित्त माझी लाडकी बहिण योजना दिली आहे. जे नियमात बसतात त्या महिलांना 17 तारखेपर्यंत पैसे मिळतील. सहा हजार कोटींच्या फाईलवर सही करून तुम्हाला भेटायला आलो आहे. विरोधक आमच्यावर टीका करत आहे. मात्र, ही योजना तात्पुरती नाही महायुतीचे सरकार आणण्यासाठी तुम्ही पाठबळ द्या सहकार्य द्या. ही योजना 5 वर्ष चालेल हा अजित दादांचा वादा आहे. कुठे काटकसर करायची आणि बचत करायची हे आम्हाला माहीत आहे. महाराष्ट्र आर्थिक बाबीत सक्षम आहे. वर्षाला 3 गॅस सिलेंडर फ्री देणार आहे. मुलींसाठी मोफत शिक्षण आणले आहे. 100 टक्के फी भरणार असल्याचे अजित पवार म्हणाले.
वाचा - संजय राठोड प्रकरणावर कोर्टात काय घडलं? चित्रा वाघ यांनी केला खुलासा
शेतकऱ्यांना पुढचे वीज बिल द्यायचे काम नाही. पुढचे पण नाही आणि मागचे पण नाही. कोणी वायरमन आला तर त्याला अजित पवार याचे नाव सांगायचे. कांदा निर्यात बंदी करायची नाही. जशी वीज बिल माफ केली तसे दूध उत्पादकांना पाच रुपये अनुदान दिले. सोलर पंप तुम्हाला देणार आहोत. ज्या पद्धतीने तुम्हाला मदत त्या ठिकाणी केली आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पण आपण काही महत्त्वाचे निर्णय घेतले. गरिबाला कशी मदत होईल हाच आमचा प्रयत्न आहे. तुम्ही म्हणणार हे सगळे कसे करणार पण आम्ही करणार आहे. केंद्र सरकारला आम्ही सांगितले आहे की आम्हाला निधी पाहिजे. जसा आंध्र प्रदेश, गुजरातला मिळाला तसा वाढीव निधी द्या. हे सगळे सांगण्यासाठी जन सन्मान यात्रा आहे. तुम्हाला लाभ आणि बळ कसं देता येईल यासाठी यात्रा आहे. आम्ही पहाटेपासून काम करणारे लोक आहोत. 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण करतो, असं सांगितले.
