chitra wagh: संजय राठोड प्रकरणावर कोर्टात काय घडलं? चित्रा वाघ यांनी केला खुलासा

Last Updated:

मंत्री संजय राठोड प्रकरणी माध्यमांमध्ये विविध बातम्या येत आहेत. सद्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे त्यामुळे त्यावर बाहेर टिप्पणी करणे योग्य ठरणार नाहे.

(चित्रा वाघ)
(चित्रा वाघ)
मुंबई: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय राठोड आणि भाजपच्या फायरब्रँड प्रवक्त्या चित्रा वाघ यांच्यामध्ये चांगलाच संघर्ष पेटला होता. या प्रकरणी चित्रा वाघ यांनी कोर्टात जनहित याची केली होती. पण, याचिका मागे घेण्यावरून कोर्टाने फटकालं असं वृत्त समोर आलं होतं. पण, मी हे प्रकरण मागे घेण्याच्या कुठल्याही सुचना माझ्या वकिलांना दिलेल्या नाहीत, असा खुलासा चित्रा वाघ यांनी केला.
महाविकास आघाडी सरकार असताना 2021 मध्ये पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यात आत्महत्या केली होती. या तरुणीला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप करत चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करावी, अशी मागणी करत कोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. पण, कोर्टाने ही याचिका निकाली काढण्याच्या मुद्यावर वाघ यांच्या वकिलांना फटकारलं. 'ही याचिका निकाला का काढावी, वाघ यांची मागणी आहे का, ते स्पष्ट करा' असं मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी वाघ यांच्या वकिलांना बजावलं. या मुद्यावर चित्रा वाघ यांनी X सोशल मीडिया ट्वीट करून खुलासा केला आहे.
advertisement
मंत्री संजय राठोड प्रकरणी माध्यमांमध्ये विविध बातम्या येत आहेत. सद्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे त्यामुळे त्यावर बाहेर टिप्पणी करणे योग्य ठरणार नाहे. मनासारखा निकाल आला की लोकशाही जिंकली आणि निकाल विपरीत गेला की, न्यायालयावर दोषारोप करणाऱ्यांना न्यायालयीन प्रक्रिया समजावून सांगणे तसंही कठीण आहे, असं वाघ म्हणाल्या.
advertisement
'पण, एक बाब याठिकाणी स्पष्ट करू इच्छिते की, मी हे प्रकरण मागे घेण्याच्या कुठल्याही सुचना माझ्या वकिलांना दिलेल्या नाहीत. न्यायालयाने एखादी मौखिक टिप्पणी केली याचा अर्थ तो त्या प्रकरणाचा अंतिम निकाल नाही. न्यायालयात हे प्रकरण सध्या सुरू आहे आणि तेथे मेरिटवरच निर्णय होईल, हा माझा ठाम विश्वास आहे' असा खुलासाही वाघ यांनी केला.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
chitra wagh: संजय राठोड प्रकरणावर कोर्टात काय घडलं? चित्रा वाघ यांनी केला खुलासा
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement