विमानसेवेला हाऊसफुल्ल प्रतिसाद
नाताळ ते 31 डिसेंबर दरम्यान सलग सुट्ट्या आल्याने पर्यटनाचा टक्का वाढला आहे. कॉर्पोरेट कंपन्या आणि शाळांना सुट्ट्या असल्याने सहलींचे नियोजन करण्यात आले आहे. सद्यस्थितीत केरळ, अंदमान-निकोबार, मनाली आणि राजस्थानसाठी 85 टक्क्यांहून अधिक बुकिंग पूर्ण झाले आहे.
गोवा, राजस्थान, अंदमान, पुदुच्चरी, मनाली, दुबई, मालदीव आणि बाली. तसेच हैदराबादमार्गे रामोजी फिल्म सिटी, बंगळुरूमार्गे म्हैसूर-उटी आणि इंदूरमार्गे उज्जैन-ओंकारेश्वर जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे.
advertisement
खिशाला कात्री, तिकिटांचे दर गगनाला
पर्यटनाचा पीक सीजन असल्याने विमान कंपन्यांनी दरवाढ केली आहे. विशेषतः नाशिकहून गोवा, नागपूर आणि अहमदाबाद या मार्गांवर ही वाढ प्रकर्षाने जाणवत आहे. 24 डिसेंबर ते 3 जानेवारी या काळात हे चढे दर कायम राहतील. दिलासादायक बाब म्हणजे, जाण्याच्या तुलनेत परतीच्या प्रवासाचे दर सध्या स्थिर आहेत.
रेल्वेचीही तीच स्थिती, वेटिंग लिस्ट लांबली
केवळ विमानच नव्हे, तर रेल्वेचे आरक्षण मिळवणेही नाशिककरांसाठी कठीण झाले आहे.
सचखंड एक्सप्रेस: दिल्ली आणि राजस्थानकडे जाणाऱ्या या गाडीचे स्लिपर क्लासचे बुकिंग 10 जानेवारीपर्यंत फुल्ल झाले आहे.
इतर मार्ग: केरळ आणि हैदराबादकडे जाणाऱ्या गाड्यांचेही 100 टक्के आरक्षण झाले असून सध्या केवळ रिग्रेट किंवा लांबची वेटिंग लिस्ट पाहायला मिळत आहे.
येथे जाण्यासाठीही ओढा मात्र कायम
हैदराबाद सेवेद्वारे रामोजी फिल्म सिटी, गोवळकोंडा, बंगळुरूवरून म्हैसूर आणि उटीकरिता तर अहमदाबादहून केवडिया आणि दिल्ली येथून आग्रा, जयपूर, श्रीनगर या पर्यटनस्थळांना जाण्यासाठी पसंती दिली जात आहे. मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर, उज्जैनसाठीही इंदूर सेवेद्वारे पसंती मिळत आहे. त्याचबरोबर राजस्थान आणि अंदमान निकोबार आणि मनालीला देखील पसंती आहे.






