तुमचंही रेशन पुस्तक फाटलंय का? मग घरबसल्या या पद्धतीने काढा डिजिटल रेशन कार्ड, A TO Z माहिती

Last Updated:

Digital Ration Card : अनेक नागरिकांच्या दैनंदिन जीवनात रेशन कार्ड हा अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज आहे. मात्र, पारंपरिक कागदी स्वरूपातील रेशन कार्ड कालांतराने फाटणे, पुसट होणे किंवा हरवणे ही मोठी समस्या ठरत होती.

Ration Card
Ration Card
मुंबई : अनेक नागरिकांच्या दैनंदिन जीवनात रेशन कार्ड हा अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज आहे. मात्र, पारंपरिक कागदी स्वरूपातील रेशन कार्ड कालांतराने फाटणे, पुसट होणे किंवा हरवणे ही मोठी समस्या ठरत होती. विशेषतः पावसाळा, सततची हाताळणी आणि सुरक्षित साठवणुकीचा अभाव यामुळे शिधापत्रिकेची अवस्था खराब होत असे. अशा परिस्थितीत नागरिकांना शासकीय दुकानात किंवा कार्यालयात अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र, आता या समस्येवर आधुनिक आणि सोपा उपाय उपलब्ध झाला आहे, तो म्हणजे डिजिटल आणि PVC रेशन कार्ड.
advertisement

मेरा रेशन मोबाइल अ‍ॅप

केंद्र सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या ‘मेरा रेशन’ या अधिकृत मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून नागरिकांना आता आपले रेशन कार्ड डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून दिले जात आहे. या अ‍ॅपमुळे शिधापत्रिकाधारकांना केवळ माहिती पाहणेच नव्हे, तर संपूर्ण रेशन कार्ड मोबाईलवर नियंत्रित करण्याची सुविधा मिळते. विशेष बाब म्हणजे, या डिजिटल रेशन कार्डचा वापर करून नागरिक PVC म्हणजेच प्लास्टिक कार्ड तयार करू शकतात. एटीएम कार्डप्रमाणे मजबूत आणि टिकाऊ असलेले PVC रेशन कार्ड वापरात अधिक सोयीचे ठरत आहे.
advertisement

ई-रेशन कार्ड काढण्याची प्रक्रिया काय?

मेरा रेशनअ‍ॅपचा वापर करण्यासाठी सर्वप्रथम स्मार्टफोनमध्ये हे अ‍ॅप इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. अ‍ॅप उघडल्यानंतर लाभार्थी (Beneficiary) हा पर्याय निवडावा लागतो. त्यानंतर रेशन कार्डशी संलग्न असलेला आधार क्रमांक भरून कॅप्चा टाकावा लागतो. यानंतर ओटीपीच्या मदतीने लॉग-इन प्रक्रिया पूर्ण होते. ही प्रक्रिया सोपी असून काही मिनिटांत पूर्ण होऊ शकते.
advertisement
लॉग-इन झाल्यानंतर अ‍ॅपच्या मुख्य पानावरच डिजिटल किंवा ई-रेशन कार्ड उपलब्ध होते. या कार्डवर कुटुंबप्रमुखाचे नाव, रेशन कार्ड क्रमांक तसेच कुटुंबातील सर्व सदस्यांची सविस्तर माहिती दिसते. याच स्क्रीनवर ई-रेशन कार्ड डाउनलोड करण्याचा पर्यायही उपलब्ध असतो. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर नागरिक आपल्या मोबाईल किंवा संगणकात पीडीएफ स्वरूपात रेशन कार्ड डाउनलोड करू शकतात. ही पीडीएफ प्रत शासकीय कामांसाठी ग्राह्य धरली जाते.
advertisement
डाउनलोड केलेल्या ई-रेशन कार्डचे PVC कार्ड तयार करायचे असल्यास नागरिकांना त्यांच्या परिसरातील PVC कार्ड प्रिंटिंगची सुविधा देणाऱ्या केंद्रांशी संपर्क साधावा लागतो. सध्या सरकारी अ‍ॅपवर थेट PVC कार्ड मागवण्याची सुविधा नसली, तरी उपलब्ध पीडीएफ वापरून प्लास्टिक कार्ड सहज तयार करता येते. अनेक ठिकाणी अल्प दरात ही सेवा दिली जात असून, काही मिनिटांत PVC रेशन कार्ड तयार होते.
advertisement
PVC रेशन कार्डचे सर्वात मोठे फायदे म्हणजे ते टिकाऊ, जलरोधक आणि सहज खिशात ठेवण्यास योग्य असते. कागदी रेशन कार्डप्रमाणे ते फाटण्याची किंवा खराब होण्याची भीती राहत नाही. तसेच, वारंवार रेशन दुकानात जाताना कार्ड नीट सांभाळण्याचा ताणही कमी होतो.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
तुमचंही रेशन पुस्तक फाटलंय का? मग घरबसल्या या पद्धतीने काढा डिजिटल रेशन कार्ड, A TO Z माहिती
Next Article
advertisement
IPS Transfer: निवडणुकीच्या धामधुमीत गृह विभागाचा धक्का,  दोन IPS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी
निवडणुकीच्या धामधुमीत गृह विभागाचा धक्का, दोन IPS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश
  • निवडणूक काळात गृह विभागाचा धक्का, दोन IPS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी

  • निवडणूक काळात गृह विभागाचा धक्का, दोन IPS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी

  • निवडणूक काळात गृह विभागाचा धक्का, दोन IPS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी

View All
advertisement