नाशिकमधील आनंदवल्ली ते हरसूलपर्यंतचा मार्ग पाच तास बंद ठेवण्यात येणार आहे.
वाहतुकीचे निर्बंध आणि वेळ
दोन्ही दिवशी सकाळी 8:00 ते दुपारी 1:00 वाजेपर्यंत गंगापूर रोडवरील सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी असेल. यामध्ये एसटी बसेस, सिटिलिंक, खासगी बसेस, अवजड मालवाहू वाहने, भाजीपाला वाहतूक आणि काळी-पिवळी टॅक्सींचा समावेश आहे. मात्र, रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि पोलीस दलाच्या वाहनांना यातून सूट देण्यात आली आहे.
advertisement
शालेय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय! शिक्षक भरतीच्या पवित्र प्रक्रियेत केले ४ मोठे बदल
असे असतील पर्यायी मार्ग
प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी वाहतूक शाखेचे प्रभारी पोलीस उपायुक्त संदीप मिटके यांनी अधिसूचनेद्वारे खालील पर्यायी मार्ग सुचवले आहेत.
मार्ग 1: आनंदवल्ली गावातून उजवीकडे वळून चांदशी पूल – मुंगसरा फाटा – दुगाव मार्गे वाहने मार्गस्थ होतील.
मार्ग 2: गंगापूर रोडवरील भोसला मिलिटरी स्कूलसमोरील गेटकडून सावरकरनगर मार्गे बापू पुलावरून पुढे प्रवास करता येईल.
दरम्यान, नाशिकच्या पर्यटनात भर घालणाऱ्या या दिमाखदार सोहळ्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असून, नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.






