नाशिक : विविध कारणांमुळे कायम चर्चेत असलेला व अचानक भाववाढीमुळे सर्वसामांन्यांच्या डोळ्यात पाणी आणणार कांदा पुन्हा एकदा वाढलेल्या किमतीमुळे चर्चेत आला आहे. नाशिकमध्ये रोज साधारण 20 ते 30 रुपये विकल्या जाणारा कांदा आज 100 ते 120 रुपये प्रति किलो विकल्या जात आहे. नाशिकमधील नेमकी परिस्थिती काय आहे, याबाबत आपण जाणून घेऊयात.
advertisement
नाशिकमध्ये एक महिन्यापूर्वी कांद्याची 20 ते 30 रुपये प्रति किलो दराने विक्री केली जात होती. मात्र, आज 120 रुपये प्रति किलो दराने किरकोळ विक्री होत आहे. त्यामुळे सर्वसामान्याच्या स्वयंपाक घरातील बजेट चांगलेच बिघडले आहे. कांदा हा चर्चेचा विषय सर्वांसाठीच राहिलेला आहे.
समुद्र सपाटीपासून 2900 फूट उंचीवर, पावसाळी पर्यटनासाठी निसर्गरम्य ठिकाण, Photos
जर एका महिन्यातच दुप्पट भाव होत असतील तर भविष्यात कांदा खिशाच्या बजेटवर अधिक भार येणार आहे. 1998 मध्ये केंद्र सरकार पाडण्यास कारणीभूत ठरलेला कांदा दरवर्षीच राष्ट्रीय स्तरावरचा विषय असतो. सरकारने यावर निर्यात शुल्क लावले आहे. ते काढले तर भाव आणखी वाढणार असल्याचे नाशिक येथील कांदा व्यापाऱ्यांनी सांगितले.
पुण्यात यंदा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना मागणी, विक्रेत्यांनी सांगितलं यामागचं कारण, VIDEO
त्यामुळे आधीच भडकलेल्या महागाईत आणखी तेल ओतले जाण्याची चिन्हे आहेत. सर्वसामान्य त्यामध्ये होरपळून निघणार आहेत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. किरकोळ विक्रीसाठी वाहतूक खर्च व तसेच कांदा खरेदीनंतर दोन-तीन दिवसांनी 100 किलोमधील किमान दोन-तीन किलो कांदा खराब होतो. त्यामुळे सद्यस्थितीला किरकोळ मार्केटमध्ये 100 रुपये प्रति किलो दराने कांद्याची विक्री होत आहे.