काय म्हणाले उद्धव ठाकरे?
बऱ्याच दिवसांनी पावसात भिजत दुष्काळी दौरा केला. मी काय बोललो, यापेक्षा शेतकरी काय बोलले हे आपण दाखवले असेल. महाराष्ट्र दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा आहे. गेल्या वर्षीची नुकसान भरपाई मिळालेली नाही. 1 रुपयात पीक विम्याच थोतांड मांडलेल आहे, त्यांची मदत कधी मिळणार? कांद्याच काय झालं? नुकसान भरपाई द्यायला हवी. 25 टक्के रक्कम तुम्ही कुठून काढली? 100 टक्के मदत करायला हवी. सरकार आपल्या दारी दुष्काळ आपल्या उरावरी, असा टोला लगावत ठाकरेंनी सरकाच्या मोहिमेवर टीका केली.
advertisement
जाहिरातीवर खर्च करण्यापेक्षा यांना मदत करा. दुष्काळ दूर होवो ही साई चरणी प्रार्थना केली. पक्ष फोडा फोडीला पैसे आहेत. मात्र, शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाहीत. मुख्यमंत्री स्वतःच्या शेतात हेलिकॉपटरने जातात. इथल्या शेतकऱ्यांच्या व्यथा समजायला हव्यात. 2 फुल एक हाफ असं सरकार आहे. एका हाफने वीजबिल माफ करणार होते. सरकारला आम्ही जाब विचारणार असल्याचेही ठाकरे म्हणाले.
ट्रिपल इंजिन सरकारने शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करावे. पीकविमा कंपन्यांकडे पण गाऱ्हाणे घेऊन जाणार आहे. मी दौरा केला नाही प्राथमिक भेट आहे. टिपलेल्या व्यथा दाखवा. त्यांच्याकडे कुणी बघत नाही. दुष्काळ सदृश आणि सरकार अदृश्य अशी परिस्थिती आहे. सरकार आपल्या दारी पण थापा मारतय लै भारी. आंदोलन करावे लागेल. मराठा आंदोलनाला बसलेत त्यांच्यावर हल्ला करणारे हे निर्घृण सरकार आहे. त्यांना सरकार चालवता येत नाही. एकरी 50 हजारांची मदत व्हावी. कारभार शून्य सरकार आहे. ही सगळी थोतांड आहे. अर्ज भरण्यात खूप पैसे जात आहे. विम्या कंपन्यांचा फायदा असल्याची टीका ठाकरेंनी केली.
वाचा - मुख्यमंत्री होऊन जर गरिबांवर लाठीचार्ज करावा लागत असेल तर...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
त्यांना वाटत असेल पक्ष आणि वडील चोरले आहे. पण जनता माझ्यासोबत आहे. त्यांची शेती पंचतारांकित आहे पण शेतकरी साधा आहे. पंतप्रधान यांनी अधिवेशन बोलावले आहे. न्याय देण्यासाठी अधिवेशन घ्यावे. बहुमताच्या जोरावर त्यांनी निर्णय घ्यावा, असा सल्लाही ठाकरे यांनी मोदी यांच्यावर केली आहे.