मुख्यमंत्री होऊन जर गरिबांवर लाठीचार्ज करावा लागत असेल तर...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
बीड, 9 सप्टेंबर, सुरेश जाधव : राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी महायुतीवर जोरदार निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री होऊन गरीब कष्टकऱ्यांवरती जर लाठीचार्ज करावा लागत असेल तर काय करायची ती सत्ता असा हल्लाबोल सुळे यांनी केला. त्या बीडच्या आंबेजोगाई येथे नारायणराव काळदाते स्मृती पुरस्कार वितरण प्रसंगी बोलत हेत्या.
नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
यावेळी बोलताना सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री होऊन गरीब कष्टकऱ्यांवरती जर लाठीचार्ज करावा लागत असेल तर काय करायची ती सत्ता असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, महाराष्ट्रातील शिक्षणाचा दर्जा सुधारण्याची गरज आहे. त्यासाठी राजकारणाच्या पलीकडे जाऊन सर्वांनी प्रयत्न करावेत. केंद्र सरकारला आपल्या सोयीचा इतिहास हवा आहे. मात्र इतिहास बदलता येत नसतो असा टोलाही यावेळी सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे.
advertisement
यावेळी खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते माजी आरोग्यमंत्री आ.राजेश टोपे यांना नारायण दादा काळदाते स्मृती सन्मती पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर तेलंगणा राज्याचे जलसंपदा मंडळाचे अध्यक्ष व्ही.प्रकाश राव यांच्या हस्ते ज्येष्ठ समाजसेवक संपतराव पवार यांना डाॅ. व्दारकादासजी लोहिया लोकसहभाग पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी तेलंगणा जलसंपदा मंडळाचे अध्यक्ष व्ही.प्रकाश राव, आमदार संदीप क्षीरसागर, कृषी पाणलोट चळवळीतील तज्ज्ञ विजय अण्णा बोराडे, मानवलोकचे अध्यक्ष अशोकराव देशमुख, मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
Location :
Bid,Bid,Maharashtra
First Published :
September 08, 2023 3:49 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
मुख्यमंत्री होऊन जर गरिबांवर लाठीचार्ज करावा लागत असेल तर...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या