मित्रांसोबत स्नूकर खेळायचा प्लॅन ठरला म्हणून रात्री उशिरा घराबाहेर पडले. स्नूकर जिथे खेळायचं ठरले ते ठिकाणी रात्री बराच उशीर झाल्यानं बंद झालं होतं. मग करायचं काय म्हणून फेरफटका मारायला म्हणून गाडीने निघाले. मित्रांच्या गप्पा रंगल्या आणि अचानत नितीनं घात केला. सहा मित्रांसोबत भयंकर घडलं, त्यांनी मृत्यू डोळ्यासमोर पाहिला, आपले दोन मित्र त्यांनी डोळ्यासमोर गमावले. धक्का इतका जबरदस्त होता की त्यातून सावरणंही कठीण झालं आहे.
advertisement
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार जेएनपीटी-पनवेल महामार्गावर रात्री 12.30 वाजता शुक्रवारी धावत्या कारला कंटेनरने धडक दिली. मागून दिलेल्या धडकेत कारचं मोठं नुकसान झालं. या भीषण अपघातात दोन मित्रांचा जागीच मृत्यू झाला तर चार जणांना दुखापत झाली आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. हे सगळे मित्र सीवुड्स दारावे इथले असल्याची माहिती मिळाली आहे. स्नूकर बॉल खेळण्यासाठी रात्री साडेदहा वाजता बाहेर पडलेले मित्र रात्री उशिरा घरी परतले नाहीत. स्नूकर खेळण्याचे ठिकण बंद झालं, त्यांनी जेएनपीटी मार्गावर फेरफटका मारण्याचा निर्णय घेतला आणि त्याचाच फटका त्यांना बसला. रात्री साडेबारा वाजता हा भीषण अपघात झाला. पोलिसांनी कंटेनर चालकावर गुन्हा दाखल केला आहे.
