बदलापूरमध्ये हद्दीच्या वादामुळे रस्त्याची चाळण; नागरिक त्रस्त
नवरात्रोत्सवात प्लाझामा, बीम लाइट, लेझर बीम लाइटचा वापर करणार्यांच्या विरोधात नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा ठाणे पोलिसांनी दिला. तसेच या उत्सवाच्या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, या उद्देशाने चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. ठाणे पोलिस आयुक्तालयांच्या हद्दीत 608 सार्वजनिक आणि 3254 दुर्गामातेचे आगमन होणार आहे. प्रखर लाईट्समुळे रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात किंवा अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
advertisement
‘..आणि Alexa आली झेडपी शाळेत', अमरावतीच्या ग्रामीण शाळेत अभिनव प्रयोग
त्यामुळे अशा डार्क लाईट्सचा वापर करणार्यांविरोधात नियमानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा ठाणे शहर पोलिसांनी दिला. मनाई आदेशाचा भंग करणार्यांविरूद्ध तक्रार करण्यासाठी ठाणे पोलिसांनी टोल फ्री क्रमांक देखील दिला आहे. टोल फ्री क्रमांक 100, 112, नियंत्रण कक्ष, ठाणे शहर 9137663839 या क्रमांकावर तक्रार नोंदवण्याचे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे. ठाणे पोलिस आयुक्तालय परिसरात 608 सार्वजनिक आणि 3254 खासगी दुर्गादेवींच्या मूर्तीची स्थापना केली जाणार आहे. एकूण 133 सार्वजनिक व 287 खासगी देवींचे फोटो/ प्रतिमांची स्थापना होणार आहे. आयुक्तालयाच्या हद्दीत एकूण 590 ठिकाणी सार्वजनिक व 500 ठिकाणी खासगी गरबा होणार आहे.
बीडीडी चाळीतल्या रहिवाशांसाठी गुड न्यूज! 864 घरांचा ताबा केव्हा मिळणार?
सांस्कृतिक कार्यक्रम, भजन, आर.एस.एस. पथसंचलन, दुर्गा दौड, यात्रा, रावण दहन आदी कार्यक्रमांचेही आयोजन नवरात्रीत वेगवेगळ्या ठिकाणी केले जाते. त्या अनुषंगानेही पोलिस बंदोबस्तामध्ये बदल करणार आहेत. त्यामुळे या उत्सवादरम्यान कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन शांतताभंग होणार नाही, या दृष्टिकोनातून अधिकचा पोलिस मनुष्यबळ तसेच साधनसामुग्रीचा वापर करण्यात येणार आहे. नवरात्रीमध्ये, जास्तीत जास्त महिला/ मुली या रासगरबा दांडिया खेळण्यासाठी जमा होत असतात. त्यावेळी छेडछाड, विनयभंग, चेन/ मोबाईल/ पर्स/ बॅग स्नॅचिंग असा प्रकार घडण्याची अधिकाधिक शक्यता असते. असा प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी अधिकाधिक बंदोबस्त केली आहे.
सोलार पॅनल स्वच्छ करणे झाले सोपे, सोलापुरातील विद्यार्थ्यांनी बनवला अनोखा डिव्हाइस, असा होणार फायदा
कार्यक्रमासाठी येणाऱ्या भाविकांच्या दुचाकींची चोरी होऊ नये, शिवाय धार्मिक भावना दुखावून कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, या दृष्टिकोनातून साध्या वेशातील जास्तीत जास्त पुरुष/ महिला पोलिस अंमलदारांची नेमणूक करण्यात आली आहे. नवरात्रोत्सव शांततेत पार पडावा, या अनुषंगाने ठाण्यामध्ये पोलिस उपआयुक्त १०, सहायक पोलिस आयुक्त-१८, पोलिस निरीक्षक-१६, सपोनि/पोउपनि-४४, महिला पोलिस अधिकारी-३३, पुरुष अंमलदार २६७३, महिला अंमलदार-६१०, एसआरपीएफ कंपनी-०१, जीप-५२, ५ टनी २०, वा. संच ३५, वॉकीटॉकी १००, दुर्बीण ०२, डीएफ एमडी -०१, एचएच एमडी -०२ असा पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे.
नवरात्रनिमित्त सोलापूर शहरात वाहतुकीत मोठे बदल, बंद रस्ते- पर्यायी मार्ग कोणते?
नवरात्रीमध्ये समाजकंटकांकडून धार्मिक तेढ निर्माण करणारे मेसेजेस, पोस्ट किंवा व्हिडीओज् सोशल मीडियावर व्हायरल करू नये, यासाठी आधीच पोलिसांकडून अधिकाधिक खबरदारी घेतली जात आहे. अशा समाजकंटकांवर लक्ष ठेवून त्वरित कायदेशीर कारवाई करण्यासाठी ठाणे पोलिस आयुक्तालयाने सोशल मीडिया सेल सतर्क केला आहे.