TRENDING:

NCP : धुळ्यात राष्ट्रवादीमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा, अजितदादा गटाचा कुलूप तोडून कार्यालयावर ताबा, Video

Last Updated:

धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये हाय व्होल्टेज ड्रामा झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्यकर्ते धुळ्यात चांगलेच आक्रमक झाले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
दीपक बोरसे, प्रतिनिधी
धुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राडा, अजित पवार गटाचा कार्यालयावर ताबा
धुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राडा, अजित पवार गटाचा कार्यालयावर ताबा
advertisement

धुळे, 8 ऑगस्ट : धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये हाय व्होल्टेज ड्रामा झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्यकर्ते धुळ्यात चांगलेच आक्रमक झाले आहेत. अजित पवार यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांनी धुळे जिल्हा राष्ट्रवादी कार्यालय ताब्यात घेतलं आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार अनिल गोटे यांनी पक्षाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांनंतर धुळ्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

advertisement

अनिल गोटे यांनी राष्ट्रवादीचे पक्ष कार्यालय सोडल्याची माहिती कळताच अजित पवार गटाच्या समर्थकांनी पक्ष कार्यालयावर दावा सांगितला आहे. धुळे जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयाचे कुलूप तोडून अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयावर ताबा घेतला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मागच्या महिन्यामध्ये फूट पडली. अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांसह सत्तेमध्ये सहभाग घेतला. तसंच अजित पवारांना राष्ट्रवादीच्या बहुतांश आमदारांचा पाठिंबा आहे. याआधी नाशिकमध्येही राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये कार्यालय ताब्यात घेण्यावरून राडा झाला होता. परिसरामध्ये तणाव वाढल्यामुळे शेवटी पोलिसांना बोलावण्यात आलं होतं.

advertisement

भाजपसोबत जाणार नाही

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत पुण्यातील महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत भाजपसोबत कधीही तडजोड करणार नसल्याचं शरद पवारांनी म्हटलंय. मनात कोणीही संभ्रम ठेऊ नका, आपण भाजपबरोबर जाणार नाही. आगामी निवडणूकीच्या दृष्टीने पक्षाची बांधणी करा आपला विचार लोकांपर्यंत घेऊन जा, असा सल्ला शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला. मनात संभ्रम न ठेवता काम करा असंही यावेळी शरद पवार म्हणाले.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
NCP : धुळ्यात राष्ट्रवादीमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा, अजितदादा गटाचा कुलूप तोडून कार्यालयावर ताबा, Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल