राष्ट्रवादीच्या विलीनीकरणात खंड पडणार की पूर्ण होणार? राष्ट्रवादीच्या आमदाराने केला खुलासा
घटनेतील कायदेशीर बाबींमुळं सुनेत्रा वहिनींना घाईघाईने उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी लागत आहे. असं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंनी स्पष्ट केलं. अजित दादांच्या निधनानंतर चौथ्या दिवशी ही प्रक्रिया पार पाडावी लागतीये, यावरुन आपण तांत्रिक अडचण समजून घ्यावी. हा आमच्या पक्षाचा विषय असल्यामुळं शरद पवार साहेबांना या बाबी माहीत असतीलचं, असं नाही. असं ही शेळकेंनी स्पष्ट केलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सुनेत्रा वहिणींकडे द्यावी, आजच्या बैठकीत अशी मागणी ठामपणे करणार आहे. असा दावा ही शेळकेंनी केला. दोन्ही राष्ट्रवादीचं 12 फेब्रुवारीला विलीनीकरण होणार होतं, म्हणून आज शपथविधी घेतला असं म्हणणं चुकीचं ठरेल. मात्र पुढच्या पंधरा दिवसात दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होईल, असा विश्वास शेळकेंनी व्यक्त केलाय.