TRENDING:

SSC HSC Exam: आता कॉपी बहादरांना बसणार आळा, 10वी- 12वीच्या परीक्षेच्या आधी बोर्डाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Last Updated:

परीक्षांच्या पार्श्वभूमीवर या शैक्षणिक वर्षापासून बोर्डाने सर्व केंद्रांची कसून तपासणी करण्याचा निर्णय घेतलाय. पुणे विभागीय बोर्डाच्या अधिकार्‍यांसह शिक्षणाधिकारी, केंद्र प्रमुख आणि गट शिक्षणाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी- मार्च 2026 मध्ये इयत्ता दहावी आणि बारावीच्या होणाऱ्या परिक्षांबद्दल एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. दहावी आणि बारावी बोर्डाच्या परिक्षेच्या आधी शाळांना आणि कॉलेजला कसून तयारी करावी लागणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आता जोमाने अभ्यास करावा लागणार हे नक्की... अलीकडेच बोर्डाकडून दहावी आणि बारावी बोर्डाच्या परिक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं. वेळापत्रक जाहीर केल्यानंतर आता विद्यार्थी जोमाने परीक्षेची तयारी करत आहेत. परीक्षांच्या पार्श्वभूमीवर या शैक्षणिक वर्षापासून बोर्डाने सर्व केंद्रांची कसून तपासणी करण्याचा निर्णय घेतलाय.
शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांसह विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याचे हेतूने तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीने फेब्रुवारी-मार्च 2026 च्या प्रात्यक्षिक व लेखी परीक्षेच्या नियोजित तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.
शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांसह विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याचे हेतूने तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीने फेब्रुवारी-मार्च 2026 च्या प्रात्यक्षिक व लेखी परीक्षेच्या नियोजित तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.
advertisement

अलीकडेच, पुणे विभागीय बोर्डाच्या अधिकार्‍यांसह शिक्षणाधिकारी, केंद्र प्रमुख आणि गट शिक्षणाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षा आणि परीक्षांतील पारदर्शकतेसंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. दरवर्षी बोर्डाच्या परीक्षेच्या पहिल्या दिवशी कॉपी प्रकरणाच्या बातम्या पाहात असतो. शाळेच्या संरक्षक भिंतीवरून किंवा थेट वर्गात येऊन सुद्धा अनेक कॉपी बहाद्दर विद्यार्थ्यांना कॉपी पुरवत असतात. आता या सर्वांना आळा बसणार आहे. कारण की, शिक्षणाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीमध्ये या प्रकरणावर आता मार्ग काढण्यात आला आहे. ज्या शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये बोर्डाचे केंद्र आहे, तिथे प्रत्येक वर्गात सीसीटिव्ही कॅमेरा बसवणे अनिावर्य केले आहे.

advertisement

शाळा किंवा कॉलेजच्या परीक्षा केंद्रांवर बोर्डाने कडक नियम लागू केले आहेत. त्यानुसार प्रत्येक वर्ग खोलीत सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे अनिवार्य करण्यात आले आहे. तांत्रिक तयारी पूर्ण करण्यासाठी परीक्षा केंद्रांना 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. सीसीटीव्ही रेकॉर्डिंग परीक्षा काळात सतत चालू राहणार आहे. 30 दिवसांपर्यंत सुरक्षितपणे परीक्षेच्या काळात केंद्रांना ती रेकॉर्डिंग व्यवस्थित पद्धतीने करावे लागणार आहे. पेपर चेकिंगच्या वेळी ही रेकॉर्डिंग बोर्डाचे अधिकारी तपासणार आहेत. ज्यामुळे परीक्षादरम्यान कोणतीही अनियमितता आढळणार नाही, असे बोर्डाने सांगितलंय. पाहणी दरम्यान केंद्राकडून फोटो आणि दस्तऐवज बोर्डाकडे सादर करावे लागणार आहेत. परीक्षेच्या वेळी बोर्डाचे अधिकारी अचानक भेटी देऊन प्रत्यक्ष तपासणी करणार आहेत.

advertisement

परीक्षा केंद्रावर सीसीटिव्ही कॅमेरा लावण्याचा निर्णय बोर्डाच्या वेळी आढळणाऱ्या कॉपी प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलाय. यासोबतच आणखी एक निर्णय घेण्यात आला आहे. तो म्हणजे संरक्षक भिंत आणखी मोठी बांधण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जेणेकरून कॉपी बहाद्दरांना त्यावर चढून इतरत्र विद्यार्थ्यांना कॉपी पुरवताना शक्य नसेल. ती संरक्षक भिंत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आणि परीक्षा केंद्राच्या गोपनीयतेसाठी महत्त्वाची असेल. यासोबतच स्वच्छतागृह, पाण्याची पुरेशी सोयसह इतर मूलभूत सुविधाही परीक्षा केंद्रावर उपलब्ध असणे आवश्यक आहे. सुविधांचा अभाव असलेल्या आणि अपुरी तयारी असलेल्या केंद्रांची मान्यता बोर्डाकडून रद्द केली जाणार आहे. याशिवाय, मान्यता रद्द करताना बोर्डाकडून किंचितही संकोच केला जाणार नाही.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरी सोडण्याचं धाडस केलं अन् सुरू केलं केक शॉप, आज मनाली वर्षाला कमावते 24 लाख!
सर्व पहा

दरम्यान, बोर्डाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाल्यानंतर शाळा आणि महाविद्यालय प्रशासनाकडून आता पूर्वतयारीला वेग मिळाला आहे. 15 नोव्हेंबर 2025 पासून बोर्डातल्या अधिकाऱ्यांकडून प्रत्येक केंद्राची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार आहे. बोर्डाचे अधिकारी फोटो, दस्तऐवज तपासतील आणि अचानक भेटी देऊन सुविधा पडताळतील. अपुरी तयारी असलेल्या केंद्रांची मान्यता रद्द करण्यात येईल. यंदाची बोर्डाची परीक्षा कॉपीमुक्त व्हावी, असा बोर्डाचा निर्णय आहे. गेल्या वर्षी ज्या परीक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणावर कॉपी प्रकरणे पकडली गेली आहेत. त्यांची ही मान्यता रद्द करण्याचा निर्णय बोर्डाकडून घेण्यात आला आहे. डिजीटल वॉचच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर डिजीटल वॉच ठेवला जाणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या केंद्रांवर कठोर कारवाई होईल, ज्यात दंडापासून ते परीक्षा रद्द करण्यापर्यंत उपाययोजना असतील असा स्पष्ट इशारा बोर्डाने दिलाय.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
SSC HSC Exam: आता कॉपी बहादरांना बसणार आळा, 10वी- 12वीच्या परीक्षेच्या आधी बोर्डाचा महत्त्वपूर्ण निर्णय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल