याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भाजप नेता आणि बंगळुरू दक्षिणचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट करून याबाबत माहिती दिली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
advertisement
वैष्णव म्हणाले, "लवकरच मुंबई आणि बंगळुरूदरम्यान एक सुपरफास्ट ट्रेन सुरू केली जाणार आहे. आर्थिक उलाढालींच्या बाबतीत दोन्ही शहरं अतिशय महत्त्वाची आहेत. शिवाय, दोन्ही शहरांतील रेल्वे स्टेशन्सचा विकास आणि विस्तार झाला आहे. त्यामुळे आता नवीन सुपरफास्ट ट्रेन चालवणं शक्य होणार आहे. ही मागणी 30 वर्षांपासून प्रलंबित होती."
मुंबई आणि बंगळुरू या दोन महत्त्वांच्या शहरांदरम्यान सध्या फक्त एकच ट्रेन सुरू आहे. उद्यान एक्सप्रेस असं नाव असलेली ही गाडी प्रवास पूर्ण करण्यासाठी 24 तासांचा वेळ घेते. त्यामुळे हा प्रवास कंटाळवाणा होतो. तेजस्वी सूर्या यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागीलवर्षी म्हणजेच 2024मध्ये दोन्ही शहरांमध्ये 26 लाखांहून अधिक लोकांनी विमान प्रवास केला. रेल्वे सुविधेच्या अभावी अनेकांना इच्छा नसतानाही विमान प्रवासाचा पर्याय स्वीकारावा लागतो. आता मात्र, नवीन ट्रेनमुळे लाखो प्रवाशांची सोय होईल.