Mumbai News : मुंबई शहरात ईव्ही वाहन धारकांचे टेन्शन मिटले, मध्य रेल्वेच्या 'या' स्थानकाबाहेर ईव्ही बॅटरी बदलण्याची सुविधा
Last Updated:
EV Battery Swapping Facility At Central Railway Stations: मुंबई शहरातील ईव्ही वाहन धारकांना बॅटरी चार्जिंगसाठी तासांताची वाट पाहावी लागणार नाही. मध्य रेल्वेच्या काही प्रमुख स्थानकांवर आता ईव्ही बॅटरी बदलण्याची सुविधा सुरु झाली आहे.
मुंबई : मुंबईतील इलेक्ट्रिक वाहन धारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वे आपल्या काही प्रमुख स्थानकांच्या बाहेर ई-बॅटरी स्वॅपिंग स्टेशन सुरू करण्याची योजना आखत आहे. यामध्ये पहिले बॅटरी स्वॅपिंग स्टेशन लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकाबाहेर उभारण्यात आले आहे. जे लवकरच नागरिकांसाठी सुरू केले जाणार आहे. या प्रणालीच्या स्थापनेसाठी 5 वर्षांच्या कालावधीसाठी इंडो फास्ट एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडला टेंडर दिला गेला आहे.
या योजनेसाठी कंपनीकडून 4.05 लाख रुपये लायसन्सिंग फी मिळणार आहे. तसेच कांजुरमार्ग स्टेशनवरील टेंडर प्रक्रियाही अंतिम टप्प्यात आहे. कमर्शियल डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांच्या मते या नव्या सुविधेमुळे इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करणाऱ्यांना मोठा लाभ होईल तर रेल्वेला नॉन-फेअर रेव्हेन्यू मिळण्यासही मदत होईल. ही पायरी स्वच्छ ऊर्जा, स्मार्ट लास्ट-माइल कनेक्टिव्हिटी आणि पर्यावरणपूरक उपाययोजनांना चालना देईल.
advertisement
किती वेळ लागणार?
ई-बॅटरी स्वॅपिंग प्रणाली अंतर्गत, इलेक्ट्रिक दुचाकी आणि तीनचाकी वाहनांचा वापर करणारे लोक आपल्या संपलेल्या बॅटरी पॅकला फक्त दोन मिनिटांपेक्षा कमी वेळात पूर्ण चार्ज केलेल्या बॅटरीशी बदलू शकतात. या युनिट्सची स्थापना कडक सुरक्षा, तांत्रिक आणि पर्यावरणीय निकषांनुसार केली जाईल, ज्यामुळे डिलिव्हरी एजंट्स आणि फ्लीट ऑपरेटर्ससारख्या दैनंदिन ई-वाहन वापरकर्त्यांसाठी ही सुविधा सुलभ आणि सोपी होईल.
advertisement
पश्चिम रेल्वे देखील आपल्याच्या स्थानकांवर अशाच प्रकारच्या ई-बॅटरी स्वॅपिंग स्टेशन सुरू करण्याची योजना आखत आहे. यामध्ये पहिला बॅटरी स्वॅपिंग स्टेशन मुंबई सेंट्रल स्टेशनच्या बाहेर उभारला जाणार असून लवकरच टेंडर प्रक्रिया पूर्ण करून हे स्टेशन सुरू केले जाईल.
याशिवाय मुंबई मेट्रो आणि मोनोरेल स्थानकांवरही ही सुविधा उपलब्ध होणार आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमएमओसीएल) ने 25 मेट्रो आणि 6 मोनोरेल स्थानकांवर ई-बॅटरी स्वॅपिंग स्टेशन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेतून दहिसर ईस्ट मेट्रो स्टेशनवर हा पहिला स्वॅपिंग स्टेशन यशस्वीरित्या उभारण्यात आला आहे. या सुविधेमुळे मेट्रो प्रवाशांनाही इलेक्ट्रिक वाहनांची चार्जिंग आणि बॅटरी बदलण्याची सुविधा मिळणार आहे.
advertisement
रेल्वे आणि मेट्रो स्थानकांवर ई-बॅटरी स्वॅपिंग स्टेशन सुरू होणे हे मुंबईत पर्यावरणपूरक वाहतुकीस चालना देणारे महत्त्वाचे पाऊल आहे. यामुळे इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढेल, प्रवाशांसाठी सोयीस्कर सुविधा उपलब्ध होईल आणि शहरातील स्वच्छ ऊर्जा वापराला गती मिळेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 28, 2025 8:41 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News : मुंबई शहरात ईव्ही वाहन धारकांचे टेन्शन मिटले, मध्य रेल्वेच्या 'या' स्थानकाबाहेर ईव्ही बॅटरी बदलण्याची सुविधा