दिल्लीमध्ये आयोजित ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स सोसायटीच्या 65 व्या वार्षिक अधिवेशनात ते बोलत होते. इथेनॉलच्या वापरामुळे वाहनांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत असल्याचा दावा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. वाहनाच्या इंजिनावर होणारा परिणाम, कमी मायलेज, इथेनॉल कंपनीत गडकरींच्या कुटुंबीयांचे असणारे आर्थिक हितसंबंध अशा वेगवेगळ्या मुद्यावर सोशल मीडियावर नितीन गडकरींवर प्रचंड टीका सुरू आहे.
advertisement
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या टीकेबाबत पहिल्यांदाच भाष्य केले. त्यांनी म्हटले की, "आपण दरवर्षी 22 लाख कोटी रुपयांचे पेट्रोलियम पदार्थ आयात करतो. जर इथेनॉलसारख्या पर्यायामुळे हेच 22 लाख कोटी देशाच्या अर्थव्यवस्थेत वाचणार असतील, तर ते करायला नको का?" असा सवाल त्यांनी केला.
गडकरींनी स्पष्ट केले की इथेनॉलचा वापर हा देशाच्या आर्थिक स्वावलंबनासाठी आणि इंधन आयात कमी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे सोशल मीडियावरून केली जाणारी टीका ही केवळ दिशाभूल करणारी असून, त्यामागे राजकीय हेतू असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला.