एकीकडे ही चर्चा असताना उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवरून धाराशिवमधील राजकीय वातावरण तापलं आहे. विरोधी पक्षाची जी मतं फुटल्याचा दावा केला जातोय, यामध्ये धाराशिवचे ठाकरे गटाचे खासदार ओम राजेनिंबाळकर यांचा समावेश असल्याचा दावा केला जातोय. धाराशिवमध्ये सोशल मीडियावर याबाबतचं एक कॅम्पेन देखील राबवलं जातंय. आम्हाला कळलं! धन्यवाद खासदार... ओम.... अशा आशयाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले जातायत. भारतीय जनता पार्टीकडूनच हे पोस्टर आणि मीम्स शेअर केले जात असल्याचा संशय आहे.
advertisement
खरं तर, उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवरून धाराशिवचं राजकारण तापलं आहे. या निवडणुकीत विरोधी पक्षाची मतं सत्ताधारी उमेदवाराला गेल्याचा हवाला देत मागील अनेक दिवसापासून खासदार ओमराजे निंबाळकर यांना लक्ष्य केलं जात आहे. भारतीय जनता पार्टीकडून 'आम्हाला कळलं धन्यवाद ओम' अशा आशयाची टॅगलाईन वापरत खासदार ओम राजे निंबाळकर यांच्यावर टीका केली जात आहे. "धन्यवाद खासदार ओम निंबाळकर, आम्हाला कळलं, तुम्हालाही कळलं" अशा आशयाची मीन्स व फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
हे सगळे फोटो आणि मीम्स भाजप आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांच्या टीमकडून केले जात असल्याचा दावा केला जात असून त्याला ओमराजे निंबाळकर यांच्या समर्थकांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. हिंमत असेल तर उघड करा, असे आव्हान ओमराजे यांच्या कार्यकर्त्यांनी दिले आहे. गेल्या काही दिवसांपासुन भाजप व शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यात सुप्त संघर्ष सुरू आहे. मात्र याबाबत उघडपणे कोणीच बोलत नाहीये. मात्र सोशल मीडियावर जोरदार वाक युद्ध रंगलं आहे.