हुबळी आणि पंढरपूरदरम्यान विशेष अनारक्षित गाड्या चालवण्यासंदर्भात रेल्वे प्रशासनाने सविस्तर वेळापत्रक जाहीर केले आहे.
या अंतर्गत दोन विशेष अनारक्षित गाड्या चालविण्यात येणार आहेत. गाडी क्रमांक- डाऊन 07351 आणि अप 07352 एसएसएस हुबळी- पंढरपूर अनारक्षित एक्स्प्रेस विशेषच्या चार फेऱ्या होणार आहेत. हुबळी येथून गाडी क्रमांक 07351 29 ऑक्टोबर आणि 1 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 05:10 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सायंकाळी 4 वाजता पंढरपूरला पोहोचेल. गाडी क्रमांक 07352 पंढरपूरहून त्याच दिवशी सायंकाळी 6 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजता हुबळी येथे पोहोचेल. या रेल्वेला 1 एसी टू- टायर, 2 एसी थ्री- टायर, 12 स्लीपर, 5 जनरल सेकंड क्लास आणि 2 ब्रेक व्हॅन असे एकूण 22 कोच असतील.
advertisement
तर दुसरी ट्रेन हुबळी- पंढरपूर एक्सप्रेस अशी असणार आहे. गाडी क्रमांक- डाऊन 07367 आणि अप 07368 एसएसएस हुबळी- पंढरपूर अनारक्षित एक्सप्रेसच्या विशेष आठ फेऱ्या होणार आहेत. गाडी क्रमांक 07367 ही 30, 31 ऑक्टोबर आणि 2, 3 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 05:10 वाजता हुबळीहून सुटून दुपारी 4 वाजता पंढरपूर येथे पोहोचेल. गाडी क्रमांक 07368 ही पंढरपूरहून त्याच दिवशी सायंकाळी 6 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजता हुबळीला पोहोचेल. या रेल्वेला सुद्धा 1 एसी टू- टायर, 2 एसी थ्री- टायर, 12 स्लीपर, 5 जनरल सेकंड क्लास आणि 2 ब्रेक व्हॅन असे एकूण 22 कोच असतील.
